ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 581 कोरोनाबाधित, तर 363 जण कोरोनामुक्त - पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 581 बाधित

पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी तब्बल 581 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर खेड येथील 55 वर्षीय व्यक्तीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 363 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात 581 बाधित तर 363 जण कोरोनामुक्त
author img

By

Published : Jul 7, 2020, 10:36 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सोमवारी शहरातील बाधित रुग्णांनी उच्चांक गाठत तब्बल 581 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर खेड येथील 55 वर्षीय व्यक्तीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 363 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांचा आकडा 4 हजार 861 वर पोहचला असून चिंता वाढली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 1 जुलै पासून कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज रुग्ण वाढत असल्याने शहरातील नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. आज देखील 581 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आत्तापर्यंत 2 हजार 906 जण हे कोरोनामुक्त झाले असून ठणठणीत बरे झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मार्फत एकूण 11 क्वारंटाइन सेंटर असून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आणि भोसरी महानगर पालिकेच्या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर आणि ग्रामीण भागात आढळले कोरोना बाधित / डिस्चार्ज

5 जुलै - 336 बाधित / 174 डिस्चार्ज

4 जुलै - 209 बाधित / 136 डिस्चार्ज

3 जुलै - 276 बाधत / 79 डिस्चार्ज

2 जुलै - 314 बाधत / 168 डिस्चार्ज

1 जुलै - 212 बाधत / 124 डिस्चार्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.