बारामती- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ऊर्जामंत्री व सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात ग्राहकांचे वीज बिल माफ करू, विज बिल युनिट मध्ये सवलत देऊ, वाढीव बिले दिली जाणार नाही, आदी घोषणा केल्या होत्या. मात्र ऊर्जामंत्री राऊत यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती नाही असे सांगितले. त्यांना या परिस्थितीचा अंदाज नव्हता का असा सवाल उपस्थित करून महाविकास आघाडी सरकारने शेतकरी व ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला.
हेही वाचा - रिफायनरीबाबत समर्थक आशावादी, ठाकरे सरकारने पुनर्विचार करण्याची भाजपची मागणी
वीज बिल माफ न झाल्यास तीव्र आंदोलन...
कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने राज्यातील सर्वांचीच सक्तीची वीज बिल वसुली सरकारने थांबवावी. तसेच वीज बिल माफ करावेत. अशी मागणी करत इंदापूर येथील महावितरणचे अभियंता गोफणे यांना निवेदन दिले. वीज बिल माफ न झाल्यास शेतकरी व वीज ग्राहकांना एकत्रित करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.
हेही वाचा -विठूनगरी 8 महिन्यांच्या विश्रांतीनंतर पूर्वपदावर, मुखदर्शनाची संख्या एक हजाराहून दोन हजारावर
या आंदोलनात यांनी घेतला सहभाग...
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, भाजप शहराध्यक्ष शकील सय्यद, निरा भिमा कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, मंगेश पाटील, मयूरसिंह पाटील, अॅड.कृष्णाजी यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, भरत शहा, नगरसेवक कैलास कदम, दत्तात्रेय शिर्के, प्रताप पाटील, मोहन गुळवे, धनंजय पाटील , ललेंद्र शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.