ETV Bharat / state

बारामतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे अर्धनग्न होत मुंडन आंदोलन - baramati latest update

बारामती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगाराला तीन महिने पगार मिळाला नाही. बोनस मिळाला नाही. काही कामगारांना वय जास्त झाले, या कारणास्तव कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

ग्रामपंचायत कर्मचारी
ग्रामपंचायत कर्मचारी
author img

By

Published : Dec 13, 2020, 11:56 PM IST

बारामती - बारामतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी अर्धनग्न होत मुंडन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे, पगार न देणे, या समस्यांना कंटाळून कर्मचारी आंदोलन करत आहेत. बारामती पंचायत समिती समोर हे आंदोलन सुरू आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून गावातून कोरानाला हद्दपार करण्याची मोहीम सुरु केली. रुग्णांच्या जवळ जाण्यासही ज्या ठिकाणी घरातील माणसे धजावत नव्हती. अशावेळी मात्र राज्यभरातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी अगदी गावात स्वच्छता करणे, सॅनिटायझर फवारणी, बॅरिगेट लावणे यापासून ते रुग्णाला रुग्णवाहिकेत बसविणे. तसेच रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यविधी करण्याचे ही काम केले.

ग्रामपंचायत कर्मचारी

प्रशासनाचा निषेध-

मात्र त्याच कर्मचाऱ्यांना आज वेगवेगळ्या कारणास्तव कामावरून काढून टाकणे, पगार न देणे, बोनस न देणे अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या विरोधात बारामतीतील महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने बारामती पंचायत समिती समोर अर्धनग्न होऊन, मुंडण करुन प्रशासनाचा निषेध नोंदवत आंदोलन सुरू केले आहे.

दहा महिन्यांपासून होतेय हेळसांड-

बारामती तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगाराला तीन महिने पगार मिळाला नाही. बोनस मिळाला नाही. काही कामगारांना वय जास्त झाले, या कारणास्तव कामावरुन काढून टाकण्यात आले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र याविषयी मागील दहा महिन्यांपासून पत्रव्यवहार सुरु आहे. तरीही पंचायत समितीसह वरिष्ठ अधिकारी याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र आहे.

प्रश्न सुटणे गरजेचे-

बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारांचे प्रश्न छोट्या स्वरुपातील आहेत. त्यांची मागणी ही अत्यंत तुटपुंजी व समर्पक आहे. अशा छोट्या विषयासाठी कर्मचाऱ्यांना थंडीच्या दिवसात अर्धनग्न होऊन मुंडन करावे लागते, ही खरी शोकांतिका आहे. बिडीओंनी तात्काळ यामध्ये लक्ष घालून या कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा व आंदोलनापासून कामगारांना परावृत्त, करावे अशी मागणी जनतेतून होत आहे.

हेही वाचा- महाराष्ट्र कोरोना अपडेट, राज्यात ३,७१७ नवीन रुग्णांचे निदान, ७० रुग्णांचा मृत्यू

हेही वाचा- लग्नाहून घरी परतणाऱ्या तरुणांवर काळाचा घाला; ट्रक-ऑटोच्या भीषण अपघातात 4 जण जागीच ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.