ETV Bharat / state

Compensation for Livestock : अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास तात्काळ नुकसानभरपाई देणार

ज्यामध्ये १ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

Minister of State Dattatraya Bharane
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
author img

By

Published : Dec 4, 2021, 8:59 AM IST

बारामती - राज्यात अवकाळी पावसामुळे पशुधनाचे फार मोठे नुकसान झाले आहे. राज्यामध्ये १ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत. बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे २ हजार जनावरांचे मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच सातारा जिल्ह्यामध्ये २०० जनावरे, नाशिक जिल्ह्यामध्ये ५१५ जनावरे, अहमदनगर ७१३ जनावरे आणि रायगड येथे २ जनावरे मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात ७५०, आंबेगाव तालुक्यात ४०३, शिरूर तालुक्यात ३८१, पुरंदर तालुक्यात १५०, मावळ तालुक्यात ११०, खेड तालुक्यात ९४, बारामती तालुक्यात ८८, दौंड तालुक्यात ४४ व हवेली तालुक्यात २३ एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या मृत्यूचा आकडा असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये पंचनामे सुरू असून कुणाचे राहिले असल्यास त्यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांच्याकडे जाऊन पंचनामे करून घेण्याच्या सूचना भरणे यांनी दिल्या.

पुढे भरणे म्हणाले, कानाडवाडी येथील लांडग्यांच्या हल्ल्यात २४ शेळ्या मृत्युमुखी पडल्याच्या घटनेचा आढावा घेऊन वनविभातील अधिकारी वर्गाला तात्काळ मूल्यांकन करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेळी-मेंढी करिता ४ हजार रुपये, गाई करिता ४० हजार रुपये ३० हजार रुपये इतकी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी मुकणे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.