खेड (पुणे) - गुन्हे शोध पथकाने कारवाई करत 28 हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. राजगुरुनगर शहरामधील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये ही कारवाई केली. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
28 हजार 192 रुपयांची देशी दारू जप्त
पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामधील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री केली जात असल्याची माहिती खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांना मिळाली. त्यानंतर ही कामगिरी खेड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आली. त्यानुसार कारवाई करण्यासाठी पथक शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये गेले. येथे रोहिदास माने हा त्याच्या घराशेजारी देशी दारू विक्री करत असल्याचे खेड पोलिसांच्या पथकाला दिसले. लगेच पोलिसांनी छापा टाकला. यात एकूण 28 हजार 192 रुपये किंमतीची देशी दारू हस्तगत केली. याप्रकरणी आरोपीवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेड पोलिसांची कारवाई
ही कारवाई खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक पोलीस अंमलदार सचिन जतकर, शेखर भोइर, स्वप्निल गाढवे, निखिल गिरीगोसावी, श्रद्धा मालवणकर, सारिका बोरकर, विशाल कोठावळे, संदीप कारभल, भाऊ जोशी व मंगेश अभंग यांनी केली.
हेही वाचा - Corona Death Audit : राज्यात कोरोना मृत्यूचे डेथ ऑडिट, आतापर्यंत ८६ हजार ६१८ रुग्णांचा मृत्यू