ETV Bharat / state

शिरुर तालुक्यात दोन अवैध दारू भट्ट्या पोलिसांकडून उद्धवस्त

शिरुर तालुक्यात आज अवैध दारूचे धंदे सुरुच आहेत. त्यामुळे शिरुर पोलिसांनी या अवैध दारू धंद्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. आण्णापूर व डोंगरगण या ठिकाणच्या दारूभट्टीवर पुणे पोलिसांनी कारवाई केली.

पुणे पोलिसांकडुन अवैध दारुसाठा उद्धवस्त
author img

By

Published : Sep 20, 2019, 2:59 PM IST

पुणे - शिरुर तालुक्यात दारुबंदी व्हावी यासाठी महिलांसह नागरिकांनी गावागावात जाऊन मोठा संघर्ष केला. मात्र, शिरुर तालुक्यात आज अवैध दारूचे धंदे सुरुच आहेत. त्यामुळे शिरुर पोलिसांनी या अवैध दारू धंद्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. आण्णापूर व डोंगरगण या ठिकाणच्या दारूभट्टीवर पुणे पोलिसांनी कारवाई केली.

पुणे पोलिसांकडून अवैध दारूसाठा उद्धवस्त

शिरूर पोलिसांनी शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गावठी दारूच्या हात भट्टीवर कारवाई करण्याचा धडाका सुरू केला असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पाहावयास मिळत आहे. डोंगरगण येथे 2600 लिटर दारुचे कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. यातच पुन्हा आण्णापूर येथे अवैध दारुच्या भट्ट्यावर छापा टाकत सुमारे 1600 लिटर दारूचे रसायन जागेवर नष्ट करून दारूसाठी लागणारे तेथील उपलब्ध साहित्यही नष्ट करण्यात आले आहे. दरम्यान पुढील काळात शिरुर तालुक्यात अवैध धंदे व दारूभट्ट्या सुरू असल्यास कडक कारवाईचे धोरण राबवणार असल्याचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी सांगितले.

Intro:Anc__शिरुर तालुक्यात दारुबंदी व्हावी यासाठी महीलांसह तालुक्यातील नागरिकांनी गावागावांत जाऊ मोठा संघर्ष केला मात्र शिरुर तालुक्यात आज अवैध दारुचा धंदा सुरुच असताना शिरुर पोलीसांनी अवैध दारु धंद्यावर कारवाईचा धडाका लावत आण्णापुर व डोंगरगण येथे दारुभट्टीवर मोठी कारवाई केली आहे

शिरूर पोलिसांनी शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध गावठी दारूच्या हात भट्टीवर कारवाई करण्याचा धडाका सुरू केला असल्याचे चिञ सध्या तालुक्यात पाहावयास मिळत आहे.काल संध्याकाळी डोंगरगण येथे 2600 लिटर दारुचे कच्चे रसायन काल नष्ट करण्यात आसतानाच आज सकाळी पुन्हा आण्णापुर येथे अवैध दारुच्या भट्ट्यावर छापा टाकत सुमारे 1600 लिटर दारुचे रसायन जागेवर नष्ट करून दारुसाठी लागणारे तेथील उपलब्ध साहित्यही नष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान पुढील काळात शिरुर तालुक्यात अवैध धंदे व दारुभट्ट्या सुरु असल्यास कडक कारवाईचे धोरण राबविणार असल्याचे शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी सांगितले.

Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.