ETV Bharat / state

बायको कपडे धुवायला सांगायची म्हणून वैतागलेल्या नवऱ्याची आत्महत्या; पुण्यातील घटना - प्रणय मिलिंद खुटाळ आत्महत्या बातमी

प्रणय मिलिंद खुटाळ (वय २९) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी कनिका खुटाळ हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणयची आई संगिता खुटाळ यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

husband-committed-suicide-due-to-wife-asked-him-to-wash-his-clothes-in-pune
कपडे धुवायला सांगाणाऱ्या बायकोला वैतागलेल्या नवऱ्याने घेतला गळफास
author img

By

Published : Dec 10, 2019, 1:52 PM IST

चार वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या एका व्यक्तीने बायको कपडे धुवायला सांगते, घरकाम करून घेते. या त्रासाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. पुण्याच्या मगरपट्टा सिटीतील जिनिया सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा-सुडाचे राजकारण करु नये, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला

प्रणय मिलिंद खुटाळ (वय २९) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी कनिका खुटाळ हिच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रणयची आई संगिता खुटाळ यांनी याबाबत तक्रार दिली आहे. प्रणय आणि कनिकाचा चार वर्षांपूर्वी प्रेम विवाह झाला होता. प्रणय हा मूळचा इंदोर येथील असून कनिका ही भोपाळची आहे. कनिका सध्या गृहिणी असून प्रणय एका खासगी कंपनीत कामाला होता.

कनिका एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती. मात्र, त्यांना मूल झाल्यानंतर तिने नोकरी सोडली होती. दोघेजण मगरपट्टा सिटीतील जिनिया इमारतीत राहायला होते. गेल्या काही दिवसांपासून कनिका प्रणयला शारिरीक व मानसिक त्रास देत होती. प्रणय कामाला जाण्यापूर्वी तिचे कपडे धुण्यास सांगून घरातील कामे करून घेत होती. तसेच, सातत्याने प्रणयची मानहानी करीत होती. कनिकाने स्वतःच्या नावावर संपत्ती करून घेण्याच्या कारणातूनही प्रणयला वारंवार त्रास दिला. त्यामुळे या त्रासाला कंटाळून प्रणयने तीन दिवसांपूर्वी राहत्या घरी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरिक्षक व्ही. ए. भाबड हे अधिक तपास करत आहेत.

Intro:(फाईल फोटो वापरावा)
बायको कपडे धुवायला सांगायची, घरकाम करून घ्यायची, वैतागलेल्या नवऱ्याने गळफास घेतला

चार वर्षापूर्वी प्रेमविवाह झालेल्या एका तरुणाने बायको कपडे धुवायला सांगते, घरकाम करून घेते. या त्रासाला कंटाळून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या मगरपट्टा सिटीतील जिनिया सोसायटीत ही घटना घडली. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Body:प्रणय मिलिंद खुटाळ (वय २९) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी कनिका खुटाळ हिच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रणयची आई संगिता खुटाळ (वय ४९) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
Conclusion:पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणय आणि कनिकाचा चार वर्षांपुर्वी प्रेम विवाह झाला होता. प्रणय हा मूळचा इंदोर येथूल असून कनिका ही भोपाळची आहे. कनिका सध्या गृहिणी असून प्रणय एका खासगी कंपनीत कामाला होता. कनिका एका नामांकित कंपनीत नोकरी करत होती. पण, त्यांना मुल झाल्यानंतर तिने नोकरी सोडली होती. दोघेजण मगरपट्टा सिटीतील जिनिया इमारतीत राहायला होते. गेल्या काही दिवसांपासून कनिका प्रणयला शारिरीक व मानसिक त्रास देत होती. प्रणय कामाला जाण्यापुर्वी तिचे कपडे धुण्यास सांगून घरातील कामे करून घेत होती. तसेच, सातत्याने प्रणयची मानहानी करीत होती. कनिकाने स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी करून घेण्याच्या कारणातूनही प्रणयला वारंवार त्रास दिला. त्यामुळे त्रासाला कंटाळून प्रण याने तीन दिवसांपुर्वी राहत्या घरी बेडशीटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक व्ही. ए. भाबड हे अधिक तपास करत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.