पुणे: 'एसएससी'चा अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणाला की, दर्शना मॅडमसोबत जो प्रकार घडला आहे तो पूर्ण एमपीएससीलाच एक काळीमा फासणारा आहे. कारण मुळात आपण येथे प्रेम करण्यासाठी आलेलेच नाही. आपण येथे आलेले आहोत ते आपल्या खेडेगावातला आपले घर सोडून, आपले आई बाप सोडून. आपण इथे फक्त अभ्यासासाठी आलेले आहोत. आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्या गोष्टीला वेळ देणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे.
अभ्यासावर लक्ष केंद्रित करा : याच्यामुळे चार-पाच वर्षे अभ्यास झालेली मुले एका ठिकाणी येतात. त्यांची काहीच प्रोसेस पुढे होत नाही आणि त्याच्यामुळे सगळ्या पोस्ट मुली घेऊन जातात. मुलांना काही एक भेटत नाही. त्याच्यामुळे मला असे वाटते की प्रेम करणे यासाठी तुम्हाला खूप वेळ आहे. नंतर पण पण पोस्ट मिळण्यासाठी तुम्हाला वेळ नाहीये. तुमचे वय होत चाललेले आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनीच अभ्यासावर फोकस करायला पाहिजे. कोणीच कोणाचे नाही आणि मला ही गोष्ट आता कुठे कुठे जाणवू लागली आहे.
विचार आई-वडिलांशी शेअर करा: एमपीएससीची दुसरी विद्यार्थिनी म्हणाली की, निश्चितच दर्शना पवारांना आपण दोष देऊ शकत नाही. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की, एमपीएससीमुळे झाले वगैरे असे काही नाही. मुळात हे प्रत्येक क्षेत्रामध्ये घडत असते. तुमची वैचारिक पातळी कुठपर्यंत आहे, तुमची विचार करण्याची क्षमता कुठपर्यंत आहे या गोष्टींचा याच्यावरती प्रभाव पडतो, असे मला वाटते. तुमच्या भावना आई-वडिलांपुढे व्यक्त करा. आई-वडिलांनीही मुलांना समजून घेतले पाहिजे. त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेम वरती सोल्युशन देणे एवढं गरजेचे आहे. शेअरिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची एखादी मैत्रीण असू द्या. मित्र मैत्रिणींसोबत जात असताना एखाद्या आपल्या जवळच्या मित्राला, भाऊ-बहिणीला लोकेशन देऊन ठेवा की आम्ही या ठिकाणी जातोय. ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे; कारण की आपल्या मागे आपली काळजी करणारे खूप सारे लोक आहेत. याचे पण या क्षेत्रातल्या मुला-मुलींनी भान ठेवले पाहिजे.
यामुळे नैराश्य येते: एक विद्यार्थी म्हणाला की, एमपीएससीची तयारी करायला लाखो विद्यार्थी येथे येतात. अभ्यास करतात जागा फार कमी असतात. त्यामधून नैराश्य येते. ताणतणाव निर्माण होतो. त्यामध्ये कुणीतरी आपली व्यक्ती असावी, आपल्याला कुणाला तरी बोलता यावे यासाठी हे भावनिक प्रेम संबंध निर्माण होतात. आजही भारतीय समाजामध्ये महिला मुलं-मुली यांच्या प्रेम संबंधाची चर्चा होत नाही. याकडे वेगळ्या दृष्टीने बघितले जाते आणि यातून संवाद होत नाही. यातून दर्शना पवार हत्याकांडासारख्या घटना घडतात. दुसऱ्या विद्यार्थ्यांना मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, आपल्याला मित्र-मैत्रिणी करताना ते कुठल्या आहेत, कसे आहेत हेही पहावे लागेल. त्याचबरोबर आई-वडिलांचे मुलावर लक्ष असणे गरजेचे आहे. मुलांनी सुद्धा आपण कुठे आहोत. काय करत आहोत. हे पाहणे गरजेचे आहे. त्यामधून एकमेकांचे विचार समजतील आणि अशा घटना घडणार नाहीत.
वाईट विचारांचे हे आहे कारण: एका विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त करताना म्हटले की, अशा घटना घडल्यानंतर आपण आज त्यावरती चर्चा करतोय. पण यापूर्वीसुद्धा अशा घटना घडल्या असतील. विद्यार्थ्यांना समजतच नाही की, आपण कुठल्या स्टेज वरती आहेत कुठल्या फ्लो वरती आहोत. आपण किती कुणामध्ये इन्व्हॉल झालो आहे. हे लक्षात येत नाही. विद्यार्थी आठ ते दहा तास अभ्यास करतात; परंतु बाकीचे सात ते आठ तास त्यांचे डोके रिकामे असते. त्यामुळे त्यावेळी वाईट विचार येणार चांगले विचार येणार हे साहाजिक आहे. नियंत्रण करणे हे आपल्या हातात असले पाहिजे. रिलेशन तयार होतात. परंतु ते तयार होताना दोघांनाही कळत नाही. त्यामुळे अशा घटना घडत असतील तर त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.