पुणे : मागील वर्षभरात समाजात जन्मलेले सर्व बालके होळीच्या दिवशी एकत्र केली जातात. जस हिंदू समाजात लहान मुलांचे बरसे केले जाते तसे या राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या वतीने या लहान मुलांची ढुंढ होते. यात एक दोन लहान मुलांना चादरीत टाकून त्याची धान्य बरोबर तुला होते. त्या वेळेस त्या चादरीला काठ्या मारल्या जातात. आणि काही म्हण म्हटल जाते. नंतर महिला, पुरुष सर्व एकत्र राजस्थानी जेवण, सामूहिक गरबा, भांग, थंडाई असे सगळे प्रकार करून हा उत्सव साजरा करतात.
समाज एकत्र येतो : या सणाची अनेक दिवसांपासूनची परंपरा आहे. यामध्ये कोणताही खंड न पडू देता हा उत्साह दरवर्षी साजरा होतो. दरम्यान, अनेक दिवस आधी या सणाची तयारी केली जाते. जसा-जसा हा सण जवळ येतो तसा याची तयारी जोरदारपणे केली जाते. यामध्ये ब्राम्हण समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होत याचे नियोजन करत असतो. तसेच, या सणानिमीत्त सर्व ब्राम्हण एकत्र येतात आणि सणाचा आनंद लुटतात.
सामूहिक गरबा, भांग, थंडाई असे कार्यक्रम होतात : आज महाराष्ट्रात पाहिले तर सर्वत्र रंग उधळण सुरू आहे. यामध्ये कित्येक लोक अक्षरश: रंगात नाहून निघाले आहेत. तर राजस्थानी ब्राह्मण समाजाच्या वतीने या लहान मुलांची ढुंढ करण्याचा उत्सव सुरू आहे. यात एक दोन लहान मुलांना चादरीत टाकून त्याची धान्य बरोबर तुला होते. या कार्यक्रमाच्यावेळी परंपरेप्रमाणे सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये राजस्थानी जेवण, सामूहिक गरबा, भांग, थंडाई असे सगळे प्रकार करून हा उत्सव पार पडतो.
जवळपास 10 हून अधिक लहान मुलांचे ढुंढ समारोह : सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून सर्वजण रंगाने नाहून निघालेले आहेत. एकमेकांना रंग लावून होळी साजरा करत आहेत. त्यावेळी राजस्थानी ब्राह्मण समाजात सामूहिक ढुंढ समारोह आयोजित करण्यात येतो. यावर्षी हा कार्यक्रम भवानी पेठ येथील कच्छी लोहाणा मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी जवळपास 10 हून अधिक लहान मुलांचे ढुंढ समारोह करण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने राजेस्थानी ब्राह्मण महिला मुली तसेच नागरिक उपस्थित होते.
हेही वाचा : Holi Festival 2023 : होळीत अशी घ्या आरोग्याची काळजी, सण होईल आनंदात साजरा