ETV Bharat / state

Pune Crime: व्यावसायिक स्पर्धेतून हॉटेल मालकाचा खून, सुपारी देऊन घडवून आणली हत्या - पुणे लाईव्ह अपडेट

रामदास आखाडे यांचे लोणी काळभोर परीसरात गारवा हॉटेल आहे. तर त्यांच्या शेजारीच आरोपी बाळासाहेब खेडेकर याचे देखील हॉटेल आहे. गारवा हॉटेल कायम गर्दीने गजबजलेले असायचे. रामदास आखाडे यांचे हॉटेल कायमस्वरूपी बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल असा विचार करून बाळासाहेब खेडेकर यांनी सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले होते.

Hotel owner murdered in Pune
पुण्यात व्यावसायिक स्पर्धेतून हॉटेल मालकाचा खून
author img

By

Published : Jul 25, 2021, 10:56 AM IST

पुणे - काही दिवसांपूर्वी पुण्यातील लोणी काळभोर परिसरातील हॉटेल मालक रामदास आखाडे (वय 38) यांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. लोणी काळभोर पोलिसांनी या खूनाचा छडा लावला असून आठ जणांना अटक केली आहे. तपासाअंती हा खून व्यावसायिक स्पर्धेतून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. शेजारीच असलेल्या हॉटेल मालकाने या खूनाची सुपारी दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आठ जणांना अटक, दोन फरार -

पोलिसांनी या प्रकरणी बाळासाहेब जयवंत खेडेकर (वय 56), निखिल बाळासाहेब खेडेकर (वय 24), निखिल मंगेश चौधरी (वय 20), गणेश मधुकर माने (वय 20), प्रथमेश राजेंद्र कोलते (वय 23), अक्षय अविनाश दाभाडे (वय 27) करण विजय खडसे (वय 21) आणि सौरभ कैलास चौधरी (वय 21) या आठ जणांना अटक केली आहे. तर हत्तेत प्रत्यक्ष सहभाग असणारे दोघे जण अद्यापही फरार आहेत.

शेजारी हॉटेल चालकानेच दिली सुपारी -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास आखाडे यांचे लोणी काळभोर परीसरात गारवा हॉटेल आहे. तर त्यांच्या शेजारीच आरोपी बाळासाहेब खेडेकर याचे देखील हॉटेल आहे. गारवा हॉटेल कायम गर्दीने गजबजलेले असायचे. रामदास आखाडे यांचे हॉटेल कायमस्वरूपी बंद पडले तर आपला व्यवसाय वाढेल असा विचार करून बाळासाहेब खेडेकर यांनी सौरभ चौधरी याला आखाडे यांचा खून करण्यास सांगितले होते. त्यानंतर सौरभ चौधरी याने इतर आरोपींच्या मदतीने आखाडे यांचा खून करण्याचा कट रचला.

हॉटेल व्यवसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू -

त्यानंतर 18 जुलैच्या रात्री रामदास आखाडे गारवा हॉटेलच्या बाहेर खुर्चीवर फोनवर बोलत बसले होते. यावेळी त्या ठिकाणी आलेल्या रामा वायदंडे याने तलवारीने त्यांच्या डोक्यात सपासप वार केले आणि तो पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या रामदास आखाडे यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. पोलिसांनी यातील आठ आरोपींना अटक केली असून आणखी दोघांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - पुण्यात या शुल्लक कारणावरुन हॉटेल मालकावर कोयत्याने खुनी हल्ला, घटना CCTV मध्ये कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.