ETV Bharat / state

पुण्यात ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाची धावपळ; अनेक ठिकाणी 4 तासांचाच बॅकअप - पुणे ऑक्सिजन बातमी

क्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. त्यातच नाशिकच्या घटनेने यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची काय परिस्थिती आहे, यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा रिपोर्ट.

pune oxygen storage news
पुण्यात ऑक्सिजनसाठी रुग्णालय प्रशासनाची धावपळ; अनेक ठिकाणी केवळ 4 तासांचाच बॅकअप
author img

By

Published : Apr 22, 2021, 7:55 PM IST

पुणे - राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रुग्णालयामध्ये बेड उपलब्ध नाही. त्यातच आता ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासतो आहे. त्यातच नाशिकच्या घटनेने यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याची काय परिस्थिती आहे, रुग्णालयामध्ये ऑक्सिजनच्या साठ्याची सुरक्षितता काय आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'चा रिपोर्ट.

रिपोर्ट

ऑक्सिजन लागणारे नवे रुग्ण घेणे बंद -

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या वाढत्या रुग्णांना उपचार देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करते आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा ही मोठी समस्या सध्या राज्यातल्या रुग्णालयांच्या समोर आहे. त्यातच नाशिकच्या रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेनंतर इतर रुग्णालयांमध्ये असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्याच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

शहराला 290 टन ऑक्सिजनची गरज -

पुणे शहराचा विचार केला तर, पुणे शहरामध्ये सध्या दररोज पाच ते सहा हजार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. यामध्ये ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या गंभीर रुग्णांचे प्रमाणदेखील मोठे आहे. या रुग्णांना ऑक्सिजनचे तसेच व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडत असते. ऑक्सिजनचे बेड मिळवण्यासाठी नातेवाईक हवालदिल होतानाचे चित्र आहे. त्यातच आता ज्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे बेड उपलब्ध आहेत, त्या ठिकाणी गेल्या दोन दिवसांपासून ऑक्सिजनचा पुरवठा हा विस्कळीत झाल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. पुण्यातल्या जवळपास 40 ते 50 रुग्णालयांनी 1 दिवसापूर्वी ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या नव्या रुग्णांना दाखल करून घेणेच बंद केले होते. पुणे शहरात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज रुग्णांना भासत आहे. त्यादृष्टीने रुग्णालये ही ऑक्सिजनचा साठा उपलब्ध कसा होईल, या दृष्टीने विचार करत आहे. सद्यस्थितीला पुणे जिल्ह्यात 380 टन ऑक्‍सिजनची निर्मिती केली जात आहे. त्यातला 290 टन इतकाच ऑक्सिजन पुणे परिसराला उपलब्ध होत आहे. त्यामुळे दररोज 80 ते 90 टन ऑक्सिजनसाठी पुण्याला इतर जिल्हे किंवा राज्यांवर अवलंबून रहावे लागत आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना नाशिक दुर्घटनेनंतर रुग्णालयांमध्ये असलेल्या ऑक्सिजनच्या साठ्याच्या सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.

ऑक्सिजन साठ्याची दर चारतासांनी होते पाहणी -

खाजगी रुग्णालयांमध्ये लहान मोठ्या ऑक्सिजनच्या साठयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दर चार तासांनी यासाठयाची तपासणी केली जाते, ऑक्सिजन कुठे लिक होत आहे का याची पाहणी केली जाते तसेच किती ऑक्सिजन शिल्लक आहे, आणखीन किती वेळात ऑक्सिजनची आवश्यकता आहे, याची पाहणीही केली जाते. सध्या अनेक खाजगी रुग्णालयांमध्ये केवळ तीन ते चार तास उपलब्ध होईल, एवढाच ऑक्सिजन साठा असल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनाला ऑक्सिजनच्या साठ्याच्या पूर्ततेसाठी दररोज झगडावे लागत असून पुणे परिसरात असलेल्या रिफिलिंग सेंटरवर रुग्णालयाचे डॉक्‍टर किंवा प्रतिनिधी जात असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते.

सरकारी रुग्णालयात ही होते तपासणी -

दुसरीकडे पुण्यातल्या सरकारी तसेच महापालिकेच्या रुग्णालयांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची आवश्यकता भासत असून या साठ्याच्या सुरक्षिततेसाठी तीन ते चार तासाने तपासणी केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यातले सर्वात मोठे सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयातदेखील अशाच प्रकारे तीन ते चार तासाने तपासणी होत असल्याचे येथील प्रशासनाने सांगितले आहे. एकंदरीतच सध्या पुणे आणि परिसरात ऑक्सिजनची उपलब्धता, त्याचा पुरवठा आणि ऑक्सिजनची सुरक्षिता या बाबी ऐरणीवर आल्या आहेत.

हेही वाचा - ऑक्सिजन ट्रेन विशाखापट्टणमला दाखल, आज रात्री महाराष्ट्राकडे होणार रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.