पुणे - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पिंपळे सौदागर येथील खुनी हल्ल्यात मृत्यूमूखी पडलेल्या विराज जगताप यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. प्रेम प्रकरणातून खुनी हल्लात विराज जगताप यांची हत्या करण्यात आली होती.
पिंपळे सौदागर येथील खुनी हल्ल्याच्या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेतली. महाराष्ट्र शासनाच्यावतीने 4 लाख 25 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला. या प्रसंगी विरोधी पक्षनेते नाना काटे, पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी विराज जगताप यांची आजी सुभद्रा जगताप यांची भेट घेऊन शासनाकडून सर्व प्रकारची मदत मिळेल तसेच या केससाठी तुम्ही म्हणाल तो वकील शासनाच्यावतीने देण्यात येईल याची ग्वाही दिली. पोलीस आयुक्तांकडून या केसबाबत माहिती घेऊन दोषीवर कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत आश्वासनही दिले.
विराज खून प्रकरण: गृहमंत्र्यांकडून जगताप कुटुंबियांचे सांत्वन..4 लाख रुपयांची मदत - अनिल देशमुख बातमी
पिंपळे सौदागर येथील खुनी हल्ल्याच्या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जगताप कुटुंबियांची भेट घेतली व महाराष्ट्र शासनाच्यावतीने 4 लाख 25 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला.