पुणे - येथे आज सायंकाळी 5.30 वाजता पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दरम्यान, साेसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत. संपूर्ण दिवाळी पावसात गेल्यानंतर आता हिवाळ्यातही पाऊस पुणेकरांची पाठ साेडायला तयार नाही.
हेही वाचा- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्रालयासमोर आंदोलन
संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शहरातील कसबा पेठ, टिळक रोड, कोथरुड, वारजे, सिंहगड रोड या भागांमध्ये मुसळधार पाऊस काेसळत आहे. त्याचबराेबर बिबवेवाडी, काेंढवा परिसरात देखील दमदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. जुलैमध्ये सुरू झालेला पाऊस यंदा थांबण्याचे नाव घेत नाही. नाेव्हेंबर महिना सुरू झाला असला तरी पाऊस अद्याप परत गेलेला नाही. सप्टेंबर अखेर पुण्यात झालेल्या पावसाने 20 हून अधिक नागरिकांचा बळी घेतला हाेता. ऑक्टाेबरमध्ये देखील शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी काेसळत राहिल्या. आता नाेव्हेंबरमध्ये देखील शहरात पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.