ETV Bharat / state

Heavy Rain : विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा धो -धो पाऊस; दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता - started raining with thunder

थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरूवात ( After short break starts raining again ) झाली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस सुरू ( started raining with thunder ) झाला आहे. काही काळातच पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालं.

Heavy Rain
विश्रांतीनंतर पुन्हा धो - धो पाऊस
author img

By

Published : Oct 20, 2022, 8:45 AM IST

पुणे : दोन दिवसांपूर्वी पुण्यात पावसाने अक्षरक्षः थैमान घातले होते. त्यानंतर थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरूवात ( After short break starts raining again ) झाली आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस सुरू ( started raining with thunder ) झाला आहे. काही काळातच पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणीच पाणी पाहायला मिळालं.

मेघगर्जनेसह पाऊस सुरू : रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला आहे. मध्य पुणे येथे गडगडाट, विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार सरी कोसळत होत्या. पाऊस रविवार इतका नसला गंभीर नसला तरी अनेक भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार दिसून आलेत. एकीकडे पुणे शहरात राजकीय पक्षांकडून पावसावरून आरोप प्रत्यारोप होत असताना पुणेकरांना मात्र याचा त्रास सहन करावा लागला आहे.

विश्रांतीनंतर पुन्हा धो - धो पाऊस

चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत : राज्यातही गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता कायम आहे. उर्वरित राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे. उत्तर अरबी समुद्रापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती, तसेच त्यापासून केरळ किनाऱ्यापर्यंत हवेचा दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. बंगालच्या उपसागरात उत्तर अंदमान समुद्रालगत ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. गुरूवारी या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकताना शनिवारपर्यंत आणखी तीव्र होईल. सोमवारपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.