पुणे - पावसाळा संपला असतानाही सातत्याने पडत असणाऱ्या अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मागील 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर बारामतीत आज (बुधवारी) पुन्हा एकदा पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली.
हेही वाचा - 'पीक विमा किंवा सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करणार'
आज दिवसभर रणरणत ऊन होतं. पाऊस पडण्याची कोणतीही चिन्हे नसताना अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस कोसळला. या पावसाने शहरातील रहदारीच्या रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले होते. बारामती येथील कऱ्हा नदीच्या पुलानजीक असणाऱ्या राज्य महामार्गावर तर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. तसेच नगरपालिका परिसरासह शहरातील रस्ते जलमय झाले होते.
हेही वाचा - मुंबई पोलिसांनी शेतकरी मोर्चावरुन 'आप'च्या धनंजय शिंदेंवर केला गुन्हा दाखल
अचानक पडलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. कामानिमित्त घराबाहेर बाहेर पडलेल्या नागरिकांना घरी परतताना जलमय झालेल्या रस्त्यातून परतीचा मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली.