ETV Bharat / state

Doctor Day : डॉक्टरांना देवदूत संबोधत आरोग्यमंत्र्यांनी मानले सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार - Health Minister rajesh tope

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या आपणा सर्वाना खूप शुभेच्छा. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाविरुद्ध लढाईत आपण अहोरात्र मेहनत करुन सामान्यांना जीवनदान देण्याचे काम करीत आहात. आपल्या कार्याला माझा सलाम ! अश्या अर्थाचे डॉक्टरांचे आभार मानणारे पत्र आरोग्य मंत्र्यानी 'राष्ट्रीय डॉक्टर दिवस' च्या निमित्ताने लिहिले आहे.

Health Minister's letter of thanks to doctors
आरोग्यमंत्र्यांनी मानले आभार
author img

By

Published : Jul 1, 2021, 11:58 AM IST

मुंबई - 'राष्ट्रीय डॉक्टर दिवस' च्या निमित्ताने राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहेत. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने जगभर थैमान माजवले आहे. या पासून सर्वांनाच वाचवणारे देवदूत हे डॉक्टर आहेत. त्यामुळे 'डॉक्टर डे' च्या विशेष दिनानिमित्त आरोग्यमंत्र्यांनी सर्वच डॉक्टर तसेच नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे पत्र लिहून आभार मानले आहेत. तसेच आज कृषीदिन असल्याने सर्व बळीराजाचेही आभार आरोग्यमंत्र्यांकडून मानण्यात आले आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे मानले आभार

आरोग्यमंत्र्यांचे डॉक्टरांना उद्देशून पत्र -

राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या आपणा सर्वाना खूप शुभेच्छा. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाविरुद्ध लढाईत आपण अहोरात्र मेहनत करुन सामान्यांना जीवनदान देण्याचे काम करीत आहात. आपल्या कार्याला माझा सलाम ! खरं म्हणजे आपल्या कौतुकासाठी शब्द कमी पडावेत असे आपण काम करीत आहात. योगायोग म्हणजे आज (१ जुलै) रोजी महाराष्ट्रात कृषी दिनही साजरा केला जातो. कोरोनाच्या कठीण काळात अन्नदाता शेतकरी आणि जीवनदाता डॉक्टर यांच्या कष्टामुळे सामान्यांना हा कठीण काळ सुसह्य होण्यास मोठी मदत मिळाली आहे. त्यामुळे डॉक्टरांसोबतच बळीराजालाही मी शतशः धन्यवाद देतो.

Health Minister's letter of thanks to doctors
आरोग्यमंत्र्यांचे डॉक्टरांना आभार पत्र

देवाचा कुठलाही एक दिवस नसतो -

डॉक्टरांचा असा एक दिवस असू नये. कारण देवाचा कुठला असा एक दिवस असतो का ? तो दररोज आपल्याला हवा असतो. आपण सारेचजण दीड वर्षापासून कोरोनाला हरविण्याच्या ध्येयाने लढतो आहोत. आपल्यासोबत आरोग्य कर्मचारी, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत. या सर्वाच्या प्रयत्नामुळे कोरोना संसर्गाचा प्रभाव रोखण्यात यश येत आहे.

डॉक्टरांवर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटना निंदनीयच -

राज्यात पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट भीषण स्वरुपाची आली. डॉक्टर तुम्ही सर्वांनी या गंभीर परिस्थितीत नागरिकांना उपचार दिले. त्यामुळे हजारोंचे प्राण वाचले. आपण जीवनदाते आहात. मात्र काहीवेळा शोकमग्न नातेवाईकांकडून भावना अनावरण झाल्यास आपल्यावर प्राणघातक हल्ले होण्याच्या घटनाही घडतात. त्याचे समर्थन नक्कीच करता येणार नाही. अशा घटना निंदनीयच आहेत. जो आपल्या जीवाची बाजी लावून दुसऱ्याच्या प्राणाचे रक्षण करतो. त्याच्या जीविताची हानी होईल, असे कृत्य कोणीही करू नये. असे आवाहन या निमित्ताने मी करतो. कोरोनाच्या काळात सामान्यांना उपचार देताना काही डॉक्टरांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.