पुणे - आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने खवय्यांना भुरळ घालणाऱ्या रत्नागिरी हापूस आंब्याचा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. येत्या आठवडाभरात यावर्षीचा हंगाम संपणार आहे. बाजारात सध्या रत्नागिरी हापूस आंब्याला चांगली मागणी आहे. रत्नागिरी हापूस आंब्याच्या एका डझनला 200 ते 300 रुपये इतका भाव मिळत आहे. परंतु दिवसेंदिवस ही आवक आता घटत जाणारआहे.
विवारी बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याच्या 10 ते 12 हजार पेट्यांची आवक झाली तर तितक्याच तयार पेट्या बाजारात आहेत. त्यामुळे बाजारात रत्नागिरी हापूस आंब्याचा तुटवडा नाही आणि आंब्याच्या किमतीही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत.
रत्नागिरी हापूसच्या किमतीही आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. या महिन्याच्या शेवटपर्यंत या आंब्याची आवक कमी होईल. त्यानंतर येणारे आंबे खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घ्यावा. यानंतर सुरू होईल गावठी आंब्याचा सिझन. असे आंबा व्यापारी शांताराम कुंजीर यांनी सांगितले.