ETV Bharat / state

Pune Mango Festival : हापूस आणि केशर आंब्याची हंगामातील पहिली खेप जपानला निर्यात

author img

By

Published : Mar 28, 2022, 3:57 PM IST

निर्यातीला चालना देत, कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) हंगामातील हापूस आणि केशर आंब्याची पहिली खेप शनिवारी जपानला ( Mangos Export To Japan ) निर्यात केली.

Pune Mango Festival
Pune Mango Festival

पुणे - निर्यातीला चालना देत, कृषी आणि प्रक्रिया अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) हंगामातील हापूस आणि केशर आंब्याची पहिली खेप शनिवार, जपानला ( Mangos Export To Japan ) निर्यात केली. अपेडाकडे नोंदणीकृत असलेल्या मेसर्स बेरीडेल फूड्स (ओपीसी) प्रा.लि. यांनी जपनाच्या लॉसन रिटेल चेनकडे हापूस आणि केशर आंबा निर्यात केला. निर्यात केलेले आंबे अपेडा मान्यताप्राप्त महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने (MSAMB) प्रक्रिया करून पॅकिंग केले आहेत.

दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्यापार मेळे - टोकियो, जपान येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय दूतावास आणि इन्वेस्ट इंडिया यांनी आंबा महोत्सवाचे ( Pune Mango Festival ) आयोजन करण्यात आले आहे. अपेडाने निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून व्यापार मेळे (ट्रेड फेअर्स), शेतकऱ्यांसाठी पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, खरेदी-विक्री मेळावा, उत्पादन केंद्री मेळावे अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.

हेही वाचा - Goa Cabinet Sworn Celebration : पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंतांसह नऊ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा; पाहा VIDEO

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.