What is Kombucha drink: कोम्बुचा हे एक आंबवलेलं प्रोबायोटिक पेय असून याला चहासारखं प्यायलं जातं. हे पेय अॅंटी-ऑक्सिडंटनं समृद्ध आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी कोम्बुचा चहा फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे. याच्या नियमित सेवनानं आतड्यांचे आरोग्य सुधारतं. शिवाय कोम्बुच्या चहा त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे त्वचा तर सुंदर होतेच मात्र, यामध्ये प्रोबायोटिक्स आणि जीनसत्त्वे भरपूर प्रमाणात आढळतात. चला तर जाणून घेऊया कोम्बुचा चहा काय आहे? कोम्बुच्या चहाचे आरोग्यदायी फायदे आणि तो कसा तयार केला जातो.
कोम्बुचा म्हणजे काय ?
कोम्बुचा चहा हा यीस्ट, चहा पत्ती, कमी साखर आणि बॅक्टेरिया घालून आंबवलेला चहा आहे. त्याची चव किंचित आंबट आणि रंग पिवळा किंवा केशरी असतो. हा चहा आंबवलेला असल्यामुळे कोर्बोनेटेडयुक्त असतो. ज्यामुळे तो फिकट रंगाचा दिसतो.
- कोम्बुचा चहाचे आरोग्यदायी फायदे
- पचनक्रिया सुधारते : कोम्बुचा चहा यीस्ट आणि बॅक्टेरीयानं समृद्ध असल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास फायदेशीर आहे. तसंच कोम्बुच्या चहा प्रोबायोटिक्स समृद्ध आहे. यामुळे चयापयच सुधारते.
- त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोम्बुचा चहा फायदेशीर: नियमित कोम्बुचा चहा प्यायल्यास त्वचा ताजी राहण्यास मदत होते. कारण कोम्बुचा चहा पाण्यामध्ये मिक्स करुन तयार केला जातो. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.
- त्वचेचा डिटॉक्सिफाई तसंच त्वचेचा टोन सुधारतो: कोम्बुच्या चहा बी1, बी2, बी6 आणि बी12 व्हिटॅमिन समृद्ध आहे. हे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय या पेयामुळे केससुद्धा मजबूत होतात. त्याचबरोबर या चहामध्ये अॅंटीऑक्सिडेंट्सचे प्रमाण मुबलक आहे. तसंच या पेयामध्ये ब्लॅक टी आणि ग्रीन टीचे गुणधर्म आहेत. यामुळे त्वचेचा पीएच सुधारतो. त्वचा चांगली होते आणि रंग देखील चांगला होतो.
- टाइप 2 मधुमेहासाठी फायदेशीर : आजकाल मधुमेह ग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोम्बुचा पेयाचं नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. हे पेय मधुमेह टाइप 2 रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
- हानिकारक जावाणू नष्ट करते: कोम्बुचा चहामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. यामुळे शरिरातील बॅक्टेरिया नष्ट होतात. चहामध्ये असलेल्या पॉलीफेनॉलप्रमाणेच कोम्बुच्या चहामध्ये अॅसिटिक अॅसिड आढळते. यामुळे आपल्या शरिरातील हानिकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत होते.
- कोम्बुचा चहा कसा तयार करतात? कोम्बुचा चहा तयार करणं खूप सोपं आहे. प्रथम गोड चहा तयार केला जातो आणि नंतर त्यामध्ये SCOBY घातलं जातं. त्यानंतर ते 7 ते 14 दिवस आंबवण्यासाठी ठेवलं जातं. परंतु ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी स्वच्छतेची आणि वेळेची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे.
संदर्भ
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC9265386/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)