पुणे : मकर संक्रांतीनिमित्त समाजामध्ये चांगला संदेश देण्यासाठी पुण्यातील भोरमध्ये जुन्या परंपरेला छेद देत, विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांचा, हळदी कुंकवाचा सुवासिनीचा मान देऊन सन्मान करण्यात आला आहे .विधवेच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने उन्नती महिला प्रतिष्ठानकडून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हळदी कुंकूसाठी उपस्थित असलेल्या विधवा महिला सन्मानाने भारावून गेल्या होत्या.
विधवा महिलांचा सन्मान : पुण्याच्या भोरमध्ये मकर संक्रांतीनिमित्त उन्नती महिला प्रतिष्ठानकडून विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्या परंपरेला छेद देत, विधवा म्हणून समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकवाचा सुवासिनीचा मान देऊन सन्मान करण्यात आला.
जुन्या रितीरिवाजाला फाटा : विधवेच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरण करणे ह्या उद्देशाने उन्नती महिला प्रतिष्ठानकडून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या रितीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ह्या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे महिलांनी एक नवा अध्याय सुरू केला आहे. यावेळी हळदी कुंकूसाठी उपस्थित असलेल्या विधवा महिला त्यांच्या सन्मानाने भारावून गेल्या होत्या. उन्नती महिला प्रतिष्ठानाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
उन्नती प्रतिष्ठानचा उपक्रम : भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रातीनिमित्त महिलांचा हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. परंतु यामध्ये ज्या महिला विवाहित आहेत त्याच सहभागी होतात. परंतु याच वाईट परंपरा समाजामधून दूर व्हाव्यात आणि प्रत्येकाला अभिमानाने जगता यावे त्यांनाही सण साजरा करता यावा, यासाठी पुण्यातील उन्नती प्रतिष्ठानने या विधवा महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रमात सन्मान केला आहे.
हळदी कुंकू कार्यक्रम : समाजातील काही प्रथांमुळे विशिष्ट वर्गाला मात्र सणाचा भाग होता येत नाही. मकरसंक्रांतीच्या पर्वावर सौभाग्याचे लेणे लेऊन सण साजरा केला जातो. दुरावा दूर करून आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी करतात. याच मकरसंक्रांतीला देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून महिलांकडून हळदी कुंकूवाच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.
हेही वाचा : Chinese Manja death : पतंगबाजी चिमुकल्याच्या जीवावर उठली; ११ वर्षीय चिमुकल्याचा गळा कापल्याने मृत्यू