बारामती - तालुका पोलिसांनी १ लाख ९८ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी ज्ञानदेव ग्यानप्पा बंडगर (२१) रा. मशीन घरकुल एमआयडीसी सोलापूर याला अटक करण्यात आली आहे.
अशी आहे घटना -
बारामती एमआयडीसी येथील स्पेनटेक्स कंपनी समोर पिकअप गाडीत (एम. एच. २४ एयु, ३८६८ ) गुटखा पान मसाला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून गुटखा भरलेल्या गाडीवर छापा टाकला. त्यात १ लाख ९८ हजार रुपये किमतीचा विमल पान मसाला मिळून आला. पोलिसांनी गुटख्यासह गुन्ह्यासाठी वापरलेले ७ लाख रुपये किमतीचे पिकअप असा एकूण ८ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
हेही वाचा - त्याग असावा तर असा, ऑलिम्पिकसाठी भालाफेकपटूने सोडली 'ही' गोष्ट!