पुणे : ससाणेनगर परिसरात असलेल्या झमझम हॉटेल समोर मध्यरात्री हा प्रकार घडला. फायरिंगमध्ये फैयाज शेख हा सराईत गंभीर जखमी झाला आहे. यश ससाणे आणि गुलाब अली गौस हे दोघेही काल (सोमवारी) ससाणे नगर परिसरात असलेल्या ससाणे लॉन्सजवळ थांबले होते. यावेळी त्यांनी फैयाज शेखवर बंदुकीतून फायरिंग केली आहे. वर्चस्ववादातून ही घटना घडल्याची महिती आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
कोयता गॅंगची दहशत शमली; पण...: पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारांचे टोळीयुद्ध सुरू झाले आहे. गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यात कोयता गॅंगची दहशत निर्माण झाली होती. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांती ही सगळी गँग मोडून काढली होती. त्यानंतर काही दिवस पुणे शहर शांत झाले, असे वाटत असतानाच काल फायरिंगची घटना घडली.
दोन गटात तुफान राडा: शहरात दररोज कुठेतरी फायरिंग, दोन गटात तुफान राडा होताना दिसत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी मोठ्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवून गुन्हेगारी कमी केली. परंतु, गल्लीबोळातले छोटे-छोटे गुन्हेगार 'गन फायरिंग' करून नागरिकांमध्ये भीती निर्माण करत आहे.
पुण्यात पैशाच्या वादातून गोळीबार: पुण्यात यापूर्वीही गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शहरातील वारजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 17 डिसेंबर, 2022 रोजी गोळीबार झाला होता. रामनगर पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर हवेत फायरिंग करण्यात आली. पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला कार्तिक इंगवले याने हवेत गोळीबार केला होता. कार्तिक हा सराईत गुंड आहे. मोक्याच्याच्या गुन्हात इंगवले फरार होता. वारजे मधील रामनगर वेताळ बुवा चौक पोलीस ठाणे हद्दीत 8 वाजताच्या दरम्यान वेताळ बुवा चौक रामनगर वारजे या ठिकाणी मोक्का मधून जामिनावर सुटलेला आरोपी कार्तिक इंगवले याने दारू पित असताना पैसे मागण्याच्या कारणावरून हवेत गोळीबार केला. या घटनेत कोणीही जखमी नाही.
हेही वाचा: