पुणे: राष्ट्रीय एकात्मता व सर्व-धर्मसमभावाचा संदेश देण्यासाठी या अभिवादन दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने विविध धर्मीय धर्मगुरू तसेच वारकरी उपस्थित होते.
सामाजिक कामात तत्पर: गेल्या 35 वर्षांपासून आमच्या साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने विविध सामाजिक कामे केली जात आहेत. सध्या राज्यातील परिस्थिती पाहता सामाजिक संदेश देण्यासाठी आमच्या मंडळातर्फे अभिवादन दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे, असे यावेळी साखळीपीर तालीम मंडळाच्या अध्यक्षा शिवानी माळवदकर यांनी सांगितले.
एकात्मता ही काळाची गरज: आज जरी आम्ही वेगवेगळ्या धर्माचे असलो तरी एकत्रित प्रेमाने राहत आहोत. ही काळाची गरज असून आजच्या या अभिवादन दिंडीच्या माध्यमातून एक अनोखा संदेश देण्यात येणार असल्याचे यावेळी विविध धर्मीय धर्मगुरूंनी सांगितले.
अपंग, महिला वारकऱ्यांसाठी मोफत सेवा: पुण्यात मुस्लिम रिक्षा चालकांनी वारकऱ्यांना मोफत रिक्षाची सेवा दिली आहे. त्यामुळे वारकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. मुस्लिम रिक्षा चालकांनी सर्वधर्मसमभावाचा आदर्श घेत अपंग आणि महिला वारकऱ्यांना मोफत सेवा दिली आहे.
मुस्लिम रिक्षा चालकांचा पुढाकार: अखंड महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख सांगणारी वारी ही महाराष्ट्राच्या परंपरेमध्ये 300 वर्षांपासून सर्वधर्मसमभावाची शिकवण देते. वारकरी संप्रदाय हाच पहिला संप्रदाय ज्याने सर्वधर्मसमभावाची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळात केली. परंपरा आजही सुरू आहे. त्यातल्या त्यात आषाढी वारीचा उत्सव हा महाराष्ट्रासाठी एक आनंद पर्वणी असतो. आपले काहीतरी योगदान राहावे असे प्रत्येकाला वाटते. त्याच दृष्टीने पुण्यातील काही मुस्लिम रिक्षा चालकांनी सर्वधर्मसमभावाचा आदर्श घेत, वारीत येणाऱ्या अपंग आणि महिला वारकऱ्यांना मोफत रिक्षा सेवा देऊन सर्वधर्मसमभावाचा आदर्श समाजासमोर उभा केला आहे.
म्हणून मोफत रिक्षा सेवा: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान केल्यानंतर, दुसरा मुक्काम पुण्यात असतो. पुण्यात दोन दिवस पालखी असते. पुणेकर ही मोठ्या आस्थेने त्या पालखीचे दर्शन घेतात. मात्र अचानक जास्त चालल्यामुळे या वारकरी दिंडीमध्ये अनेक, वृद्ध व्यक्ती, महिला, अपंग, असतात. त्यांच्या चालण्याचा त्रास कमी व्हावा आणि त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपल्यालाही थोडंसे मिळावे या उद्देशाने काही मुस्लिम बांधवांनी मोफत रिक्षा सेवा देण्याचा निर्णय घेतला. सोमवारपासून अखंड सेवा सुरू आहे. पालखी जोपर्यंत पुण्याच्या बाहेर मार्गस्थ होणार नाही, तोपर्यंत आम्ही ही सेवा करत राहणार असल्याचे या रिक्षा चालकाने सांगितले आहे.
हेही वाचा: