पुणे : पुण्यातील हवेली तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. तू पाच लाख रुपये दे नाहीतर तुझा खेळ खल्लास करतो अशी धमकी देत हवेली तालुक्यातील कूडेज गावाच्या ग्रामसेवकाचे अपहरण करण्यात आले. त्याला डांबून ठेवत खंडणी उकळल्या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील उत्तम नगर पोलिस स्टेशनला विकास प्रकाश गायकवाड व इतर दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ग्रामसेवक खाडे यांनी पोलिस स्टेशनला फिर्यादी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी हे फोर व्हिलर गाडी क्रमांक MH12/vc/7576 मधून जात असताना नटराज हॉटेल जवळ आले. त्यांच्या गाडीच्या समोरील बाजूस एक दुचाकी गाडी आली. त्यावर दोन अनोळखी इसम बसलेले होते. त्यापैकी मागे बसलेल्या इसमाने एक मोकळी बीयरची बाटली गाडीसमोर फोडली. दोन्ही इसम फिर्यादीच्या गाडीपाशी आले. त्यांनी विचारले की हॉर्न का वाजविला? असे सांगून वाद घालत असताना कुंडजे गावामध्ये राहणारे विकास गायकवाड हे तेथे आले आणि त्यांनी त्या अनोळखी इसमांना सांगितले की अरे भाऊसाहेब आपल्या येथील आहेत, त्यांना तुम्ही काही बोलू नका, आपण सरपंच समिर पायगुडे यांच्या हॉटेलवर जाऊन विषय मिटवू.
त्यानंतर तो म्हणाला की मी तुमची गाडी चालवितो तुम्ही शेजारी बसा. ग्रामसेवक विकास गायकवाड यांना शेजारी बसवले तेव्हा त्याने हातातील मोबाईल काढून घेतला. तसेच दुचाकीवरील दोन्ही लोक गाडीत मागील सीटवर बसले आणि आरोपी विकास गायकवाड याने गाडी वळवून घेतली आणि गाडी जिल्हा परिषद शाळा कुडजेचे जवळ असलेल्या दगडे फॉर्म हाऊस येथे नेऊन थांबविली. तेव्हा ग्रामसेवक यांनी विकासला गाडी येथे का आणली? असे विचारले असता आपण येथे बसून मिटवून घेऊ असे म्हणून त्याने गाडीतून उतरुन त्याचेकडील चावीने दगडे फार्मचा दरवाजा उघडला. आरोपी विकास गायकवाड याने सांगितले की मी तुमच्यावर गेले दीड महिन्यापासून पाळत ठेवत आहे. तुम्ही कुठे जाता, कोठून घरी जाता, कसे येता यावर मी लक्ष ठेऊन आहे. तुम्हांला तुमचा जीव प्यारा असेल तर तुम्ही मला पाच पेटी द्यायचे आणि तुम्ही पैश्याची जमवा जमव करा नाहीतर तुमचा विषय येथेच संपवून टाकतो, तुमची शेवटची इच्छा काय ते सांगा? असे म्हणाला.
ग्रामसेवक यांनी त्यांची खूप विनवणी करित होते. पण ते ऐकत नव्हते. त्यादरम्यान ते दोन अनोळखी इसम तेथून खाली गेले व काही वेळाने परत आले, त्यांचे हातात वडापाव होते. त्यांनी वडापाव गामसेवकाला जबरदस्तीने खाण्यास दिले. मग त्या तिघांनी तेथे असलेल्या दोरीने त्या तिघांनी मिळून ग्रामसेवकांचे दोन्ही हात व दोन्ही पाय बांधले व तेथेच असलेल्या सोफ्यावर झोपविले आणि एक दोरी गळ्याला बांधुन ती एका लोखंडी अँगलला बांधुन डांबून ठेवले होते. विकास गायकवाड याने, तुम्ही जर येथुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला तर बाहेर माझे आणखी लोक थांबले आहेत. ते तुम्हाला मारतील, असे सांगितले.
त्यानंतर आरोपी विकास याने खिशातून एक छोटी प्लॅस्टिकची बाटली काढली व म्हणाला की यात एकदम जहाल विष आहे, ते पिल्यावर तुमचा खेळ खलास होईल. तुम्ही तुमच्या हाताने ते प्या, आणि फिर्यादी ग्रामसेवक याला मृत्यूची भीती दाखवून तुमच्याकडे फोन पे मध्ये किती पैसे आहेत अशी विचारना करुन फोन पेचा पासवर्ड जबरदस्तीने विचारुन घेतला आणि फोन पेचा वापर करुन त्याने खात्यात असलेली 49,000 रु. रक्कम त्याच्या खात्यात वर्ग करून घेतली. इतरही पैसे उकळले.
घडलेल्या प्रकरणानंतर फिर्यादी ग्रामसेवक यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. विकास प्रकाश गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर संघटीत गुन्हेगारी ( मोका ) अंतर्गत करण्यात यावी अशी मागणी पुणे जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत वाव्हळ यांनी केली आहे.
Gram Sevak abducted : पाच लाख दे नाहीतर खेळ खल्लास, ग्रामसेवकाचे सिनेस्टाईलने अपहरण
पाच लाख दे नाहीतर खेळ खल्लास असे म्हणत ग्रामसेवकाचे सिनेस्टाईलने अपहरण करण्यात आले. पुण्यातील हवेली तालुक्यात ही घटना घडली. या प्रकरणी ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.