ETV Bharat / state

'सरकारने राज्यातील जनतेसाठी ५० हजार कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करावी' - pune lockdown

केंद्राकडे बोट दाखवायचे आणि राज्यातील ११ कोटी जनतेच्या तोंडाला पाने पुसायची एवढाच उद्योग या सरकारकडून सुरू आहे. राज्यातील सर्वसामान्यांचा आक्रोश सरकारच्या कानावर पोहोचावा आणि उशिरा का होईना सरकारने जागे होऊन जनतेच्या भल्यासाठी पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी आज भाजपने “माझे आंगण, माझे रणांगण” हे आंदोलन केल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

'सरकारने राज्यातील जनतेसाठी ५० हजार कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करावी'

author img

By

Published : May 22, 2020, 6:31 PM IST

पुणे - कोरोनामुळे राज्यातील मजूर, कामगार, श्रमिक, शेतकरी, खासगी कार्यालयांमध्ये काम करणारे नोकरदार तसेच लघू उद्योजक अशा सर्वांना पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागणार आहे. या सर्वांसमोर पोट भरण्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकारकडून काहीतरी मदत जाहीर होईल आणि कोरोनामुळे उद्‌ध्वस्त झालेले आयुष्य सावरण्यासाठी सामान्यांना आधार मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची घोर निराशा केली आहे. ऊठसूठ केंद्राकडे बोट दाखवायचे आणि राज्यातील ११ कोटी जनतेच्या तोंडाला पाने पुसायची एवढाच उद्योग या सरकारकडून सुरू आहे. राज्यातील सर्वसामान्यांचा आक्रोश सरकारच्या कानावर पोहोचावा आणि उशिरा का होईना सरकारने जागे होऊन जनतेच्या भल्यासाठी पॅकेज जाहीर करावे या मागणीसाठी आज भाजपने “माझे आंगण, माझे रणांगण” हे आंदोलन केल्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले.

आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या दोन कार्यकर्त्यांसह पिंपळेगुरव येथील जनसंपर्क कार्यालयाजवळ उभे राहून महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलन केले. “उद्धवा अजब तुझे निष्फळ सरकार” असा फलक त्यांनी हातात घेतला होता. तसेच पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या घराच्या अंगणात, गॅलरीमध्ये तसेच कार्यालयाजवळ उभे राहून सरकार विरोधात आंदोलन केले.

राज्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत. आज देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी सरकारचे अयोग्य नियोजन जबाबदार आहे. सरकारच्या मंत्र्यांमध्ये कोठेही एकवाक्यता दिसत नाही. विरोधी पक्ष म्हणून भाजपने आतापर्यंत राज्य सरकारला सर्वतोपरी सहकार्य केले आहे. सरकारने राज्यातील जनतेसाठी ५० हजार कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करावी, अशी पक्षाची मागणी असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.