जुन्नर(पुणे)- छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला राज्याचे राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी रविवारी सकाळी भेट देणार आहेत. यावेळी राज्यपाल किल्याच्या पायथ्यापासून पायी गड सर करणार आहेत. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजापासून किल्ल्याची पाहणी राज्यपाल करतील. राज्यपालांच्या या दौऱ्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.राज्यपाल सकाळी 10 वाजता किल्ले शिवनेरीच्या पायथ्याला उपस्थितीत राहतील. तेथून ते पायथ्यापासून गडावर पायी प्रवास करुन जातील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन करतील.
मागील 20 वर्षात पहिल्यांदाच राज्याचे राज्यपाल किल्ले शिवनेरी गडावर पायी जाऊन पहाणी करत आहेत. सध्या पावसाचे दिवस असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी किल्ले शिवनेरी गडाची पाहणी करत असताना कुठलाही अढथळा येणार नाही, यासाठी शिवनेरीवर तयारी पूर्ण झाली आहे.
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी किल्ले शिवनेरी गडावर येत असल्याने शिवभक्तांसाठी हा महत्वाचा दिवस आहे. शिवनेरी गड व परिसरात विकास कामांबाबत चांगला निर्णय होईल, अशी आपेक्षा व्यक्त केली जात आहे. किल्ले शिवनेरी गडाचा तीन तासांचा पहाणी दौरा संपल्यानंतर राज्यपाल परत राजभवनकडे रवाना होणार आहेत.