पुणे - राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांनी छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर राज्यभर विरोधी पक्ष, विविध संघटनाच्या वतीने त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. आज राज्यपाल पुणे दौऱ्यावर ( Governor on visit to Pune ) आहे. या दौऱ्यावर असताना आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले आहे.
काळे झेंडे दाखवत निषेध - राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल यांच्या विरोधात आक्रमक झाले असून गनिमी काव्याने राष्ट्रवादीने राजभवनावर आंदोलन केल. राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून काळे झेंडे दाखवत निषेध करण्यात आला. पुणे पोलिसांनी राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना नोटीस पाठवली होती.तसेच जगताप यांना वानवडी पोलीस ताब्यात घेण्यासाठी घरी गेल्या असता प्रशांत जगताप हे घरी नसून आंदोलन साठी जगताप अज्ञात स्थळी गेले होते. पण आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विद्यापीठ चौकात काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट
एकीकडे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि त्यांच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपालांची भेट घेवून त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुस्तक भेट दिले. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने ही भेट घेतली असून छत्रपती शिवाजी महाराज याच्यावरील तीन पुस्तके भेट दिली. यावेळी राज्यपालांनी दिलीगिरी ( Governor apologized ) व्यक्त करत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे मत व्यक्त केलं आहे. जर त्यांनी महाराष्ट्राची माफी नाही मागितली तर, महाराष्ट्र गप्प बसणार नाही. निषेध व्यक्त करत राज्यपाल जोपर्यंत माफी मागणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे, असे यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितल.
छत्रपती शिवाजी महाराज याच्यावरील तीन पुस्तके भेट - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांची शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, शिवाजी कोण होता, शिव छत्रपतीं एक मागोवा ही तीन पुस्तक त्यांना भेट दिली. तर या भेटी दरम्यान राज्यपालांनी माझ्याकडून चुक झाली असून मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर, भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे, या मागणीसाठी राज्यातील अनेक संघटनां आक्रमक झाल्या आहेत.
राज्यपालांनी मागितली माफी - दरम्यान आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुणे दौर्यावर आले आहेत. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे राज्यपालांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे लक्षात घेऊन,आम्ही राज्यपालांना काळे झेंडे दाखविणार अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी जाहीर केली. त्यामुळे राजभवन ते यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी स्थळापर्यन्त पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आमच्या संघाच्या शाखेत छत्रपती शिवाजी महाराजां बद्दल इतिहास शिकवण्याचे काम केल केले आहे. पण माझ्या भाषणातील विधानाचा विपर्यास करण्यात आला. माझ्याकडून चुक झाली असून मी दिलगिरी व्यक्त करत असल्याचे राज्यपाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितले. राज्यपालांनी जनते समोर येऊन माफी मागावी, या भूमिकेवर आजही आम्ही ठाम असल्याच जगताप यांनी सांगितल.