ETV Bharat / state

Bogus Typing Certificate : टीईटीनंतर आता शिक्षण मंडळात बोगस प्रमाणपत्र; तीन लिपिकांची शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र बोगस

आरोग्य भरती, टी.ई.टी घोटाळ्यानंतर (Health Recruitment and TET Scam) आत्ता शिक्षण मंडळात देखील बोगस प्रमाणपत्र (Bogus Certificates in Education Board) आढळून आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात (राज्य मंडळ) नव्याने (Govt Computer Typing Certificate Exam) भरती झालेल्या तीन लिपिकांची शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेची (Govt Computer Typing Certificate Exam) प्रमाणपत्रे बोगस (Bogus Typing Exam Certificates) आढळली आहेत.

author img

By

Published : Nov 25, 2022, 8:05 PM IST

Bogus Typing Certificate
बोगस प्रमाणपत्र प्रकरणी बोलताना अधिकारी

पुणे : राज्यात आरोग्य भरती, टी.ई.टी घोटाळ्यानंतर (Health Recruitment and TET Scam) आत्ता शिक्षण मंडळात देखील बोगस प्रमाणपत्र (Bogus Certificates in Education Board) आढळून आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात (राज्य मंडळ) नव्याने (Govt Computer Typing Certificate Exam) भरती झालेल्या तीन लिपिकांची शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेची (Govt Computer Typing Certificate Exam) प्रमाणपत्रे बोगस (Bogus Typing Exam Certificates) आढळली आहेत. latest news from Pune, Pune,

बोगस प्रमाणपत्र प्रकरणी बोलताना अधिकारी

टायपिंग परीक्षेचीही बोगस प्रमाणपत्रे : राज्य मंडळात नियुक्त झाल्यानंतर मंडळाकडून या नवनियुक्त कर्मचाऱ्यांच्या टायपिंग प्रमाणपत्रांची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून तपासणी करून घेण्यात आली. या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, टीईटी पाठोपाठ अशा प्रकारे आता टायपिंग परीक्षेचीही बोगस प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे समोर आल्याने चौकशीत आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

3 जणांचे प्रमाणपत्र हे बोगस आढळले : राज्य मंडळात 2017 साली भरतीची प्रक्रिया ही सुरू झाली आणि 2021 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. यात 262 जागा या होत्या त्यातील 200 जागा भरल्या गेल्या.हे उमेदवार जेव्हा हजर होतात तेव्हा त्यांचे सर्टिफिकेट हे तपासल्या जातात. सर्वच प्रमाणपत्र हे तपासले जातात. यात जे टंकलेखन प्रमाणपत्राची तपासणी केली असता त्यातील 3 जणांचे प्रमाणपत्र हे बोगस आढळले आहे.आत्ता यांना सेवामुक्त करण्यात आलं आहे.अशी माहिती यावेळी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

बनावट बोगस प्रमाणपत्र सर्वत्र मिळतात : असे बनावट बोगस प्रमाणपत्र हे आत्ता सर्वत्र मिळत आहे. आमच्या बोर्डात देखील अश्या प्रकारचे बनावट प्रमाणपत्र हे सापडले होते. या बोगस प्रमाणपत्र बनविणाऱ्याचे रॉकेट हे असू शकतात. हे नाकारता येत नाही. राज्य मंडळ याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असून याच्या मुळापर्यंत आम्ही पोहचणार आहोत, अस देखील यावेळी गोसावी म्हणाले.

नोकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना संगणक टायपिंग : शासकीय विभागांच्या लेखनिक संवर्गातील नोकरीसाठी हे प्रमाणपत्र बंधनकारक असून, परीक्षा परिषदेकडून त्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. मात्र आता “टीईटी’ पाठोपाठ ही टायपिंगची प्रमाणपत्रेही बोगस आढळल्याने परीक्षा परिषद पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्‍यता आहे. शासकीय नोकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंगच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असते. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत या परीक्षा घेण्यात येतात. कर्मचारी शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येते. टायपिंग परीक्षेची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येतात.

प्रमाणपत्रावरील माहितीत विसंगती - परिषदेकडून संबंधित प्रमाणपत्रावरील सीट नंबर, नाव व अन्य माहिती रजिस्टरमधील माहितीशी जुळते की नाही याची तपासणी केली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र वैध की अवैध यावर शिक्कामोर्तब केला जातो. राज्य मंडळाकडे 262 कर्मचाऱ्यांची नुकतीच भरती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांच्या टायपिंगच्या परीक्षांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात आली. यातील तीन कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रावरील माहिती परीक्षा परिषदेतील रजिस्टरमधील माहितीशी विसंगत असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे ही प्रमाणपत्रे बोगस असल्याने ती जप्त करण्यात आली असून, संबंधित तीनही कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.