पुणे- दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांनी सोन्याची खरेदी केली. कोरोनामुळे कोणालाही अक्षय तृतियेला सोने खरेदी करता आले नाही. त्यामुळे, आज दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांनी सोने खरेदीला उत्साह दाखवला. यामुळे पुण्यातील विविध बाजारपेठांमध्ये आज सकाळपासून सोने खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली.
कोरोनाच्या पाश्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बाजारपेठा बंद होत्या. नागरिकही खरेदीसाठी बाहेर निघत नव्हते. मात्र, अनलॉक नंतर आणि दसऱ्यानिमित्त नागरिक घराबाहेर पडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करत आहेत. सोन्याची नाणी, चिप्स यांची मोठ्या प्रमाणत खरेदी होत आहे. सध्या सोन्याचे दर हे ५२ हजार रुपये असून त्याला मागणीही वाढली आहे. अनलॉकमध्ये सर्व व्यवहार सुरू झाल्याने ६० ते ७० टक्के व्यवसाय पुन्हा पूर्वपदावर आले आहेत, अशी माहिती रांका ज्वेलर्सचे वास्तूपाल रांका यांनी दिली. दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून काहीच खरेदी केली नाही. योग चांगला असून सर्वकाही सुरू असल्याने आज खरेदीसाठी आलो आहोत, अशी माहिती एका ग्राहकाने दिली.
हेही वाचा- अखेर जिम उघडल्या! आजपासून व्यायामशाळा सुरु; मात्र, जिम चालकांपुढे आर्थिक अडचण