पुणे - गॅस गळती होऊन लागलेल्या आगीत दोघेजण जखमी झाल्याची घटना पुण्यातील गुरूवार पेठ भागात घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील दुर्घटना टळली.
गुरुवार पेठतील शितळादेवी चौक येथे एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर सकाळी ८ च्या सुमारास गॅस गळती होऊन आग लागली. यावेळी लागलेल्या आगीत आई आणि मुलगा जखमी झाले आहेत. महिलेला जास्त प्रमाणात भाजले आहे तर मुलगा किरकोळ जखमी आहे. दोघांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या आगीत घरातील सामानाचे नुकसान झाले आहे.