ETV Bharat / state

राजगुरुनगर शहरातील कचऱ्यामुळे पोलिसांचे आरोग्य धोक्यात

राजगुरुनगर शहरातून गोळा केलेला ओला व सुका कचऱ्याचे डंपिंग स्टेशन राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या परिसरात सुरू आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून पोलिसांना विविध रोगाची लागण होत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितला.

Rajgurunagar police station garbage problem
राजगुरुनगर पोलीस स्टेशन बातमी
author img

By

Published : Jan 24, 2021, 7:53 PM IST

पुणे - राजगुरुनगर शहरातून गोळा केलेला ओला व सुका कचऱ्याचे डंपिंग स्टेशन राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या परिसरात सुरू आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून पोलिसांना विविध रोगाची लागण होत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितला.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी व पोलीस निरीक्षक सतीश गुरव

हेही वाचा - पुणे विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे अभ्यास केंद्राची निर्मिती लवकरच - उदय सामंत

पोलिसांना साथीच्या रोगाची लागण..

पोलीस दिवस-रात्र आपले कर्तव्य पार पाडत असताना पोलीस स्टेशन व परिसरातील वातावरण स्वच्छ व काम करण्यासाठी पोषक असावे यासाठी पोलीस स्टेशन परिसरात वृक्ष लागवड करून बागबगीचा तयार करण्यात आला. मात्र, या स्वच्छ वातावरणातही काम करत असताना राजगुरुनगर नगर परिषदेच्या कचरा डंपिंग स्टेशनमुळे पोलीस स्टेशन परिसरात दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे नव्याने साथीचे आजार बळावण्याची भीती पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे सर्वत्र दुर्गंधी..

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र व राज्य सरकार कोट्यवधी रुपये खर्च करतात. त्यातून शहरेही स्वच्छ होतात. मात्र, शहरातून गोळा केलेला ओला व सुका कचरा याचे योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जात नसल्याने विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. राजगुरुनगर नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानातून अनेक पुरस्कार घेतले. मात्र, या शहरातील पोलीस स्टेशन परिसरात कचरा डेपो झाल्याने राजगुरुनगर नगरपरिषदेच्या गलथान कारभारामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे, दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी कर्तव्य पार पडणाऱ्या पोलिसांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

कचरा डेपोची अन्य ठिकाणी विल्हेवाट लावा - पोलीस

मागील चार-पाच वर्षापासून राजगुरुनगर पोलीस स्टेशनच्या बाजूला राजगुरुनगर नगरपरिषदेचा कचरा डेपो उभारला आहे. या ठिकाणी शहरातील ओला व सुका कचरा एकत्र केला जातो व त्याच ठिकाणी शहरातील चिकन व मटन दुकानातील नाशवंत मांस टाकले जाते. त्यामुळे, या ठिकाणी डुक्कर, कुत्री मोठ्या संख्येने वास्तव्य करत आहे. या परिसरातील कचऱ्याची दुर्गंधी अनेक दिवसांपासून पोलिसांची डोकेदुखी ठरत असून पोलिसांना विविध संसर्गजन्य रोगाची लागण होत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. नगरपरिषद प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घ्यावी व कचरा डेपोची वेळीच विल्हेवाट लावावी, अशी मागणी पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.

हेही वाचा - कोणी मोठ्या बापाचा असू द्या, सोडणार नाही; उपमुख्यमंत्र्यांचा खासगी सावकारांना सज्जड दम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.