पुणे : पुणे पोलीस निरिक्षक रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरूवात केली आहे. गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर बारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने युनिट ६ गुन्हे शाखा पुणे शहराकडील पोलीस पथक हे हद्दीत गस्त करत असताना दोन डिलर नानाश्री लॉजसमोर वाघोली पुणे येथे आल्याची बातमी मिळाली. त्याअनुषंगाने युनिट 6 कडून सापळा रचून आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी हे ज्या गाडीत बसले होते त्या गाडीची झडती घेतली असता गाडीत १ गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत.
गुन्हेगारांची माहिती : या प्रकरणी पोलिसांनी हनुमंत अशोक गोल्हार ( वय २४ वर्षे रा. मु.पो.जवळवाडी ता. पाथर्डी जि. अहमदनगर ), प्रदिप विष्णू गायकवाड ( वय २५ वर्षे रा. मु.पो.ढाकणवाडीता. पाथर्डी जि.अहमदनगर मुळ रा. नगररोड, चहाट फाटा, तालूका जिल्हा बीड ), अरविंद श्रीराम पोटफोडे ( वय ३८ वर्षे, रा. अमरापुरता. शेवगाव जि. अहमदनगर), शुभम विश्वनाथ गरजे श्वर( वय २५ वर्षे रा. मु.पो. बडुले ता.नेवास जि.अहमदनगर), ऋषिकेश सुधाकर वाघ ( वय २५ वर्षे रा. मु.पो. सोनई ता.नेवासा जि.अहमदनगर ), अमोल भाऊसाहेब शिंदे ( वय २५ वर्षे रा. मु.पो.खडले परमानंद ता. नेवासा जि.अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसऱ्या कारवाई मध्ये युनिट 6 कडून साहिल चांदेरे (२१) याच्याकडून ४ पिस्तूल, ९ जिवंत काडतुसे असा एकूण २,४९,००० रुपयंचा ऐवज जप्त केला आहे.
21 कोटींचा नुद्देमाल जप्क : पिस्तूल विक्री करणारे तसेच त्यांच्याकडून विकत घेणारे अरविंद पोटफोडे, शुभम विश्वनाथ गरजे, ऋषिकेश सुधाकर वाघ, अमोल भाऊसाहेब शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून वेगवेगळया ठिकाणी छापा करवाई करून एकुण १३ गावठी बनावटीचे पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, एक महीद्रा कार, मोबाईल असे एकूण २१,३२,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.