पुणे - कोरोना विषाणू प्रादूर्भावाचा यावर्षीच्या सणांवर थेट परिणाम झाला आहे. सणांशी निगडित व्यवसायांना देखील आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. काही तासांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेशमूर्ती विक्रीमध्ये 30 टक्के घट झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे. गणेश भक्त शाडूच्या गणेश मुर्त्यांना प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोना संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर व्यवसाय ठप्प झाल्याने बेरोजगारी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीच्या तुलनेत गणेश मुर्त्यांच्या किंमती कमी केल्याचे व्यवसायिक सांगत आहेत.
कोरोना इफेक्ट: गणेशमूर्ती विक्रीमध्ये 30 टक्के घट; मूर्तींच्या दरात कपात - गणेशमूर्ती विक्रीत घट
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव उत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव येथे गणेशमूर्ती विक्रीमध्ये 30 टक्के घट झाली आहे. विक्री व्हावी म्हणून व्यावसायिकांनी मूर्तींचे दर देखील कमी केले आहेत.