ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये गरीब आणि गरजूंना मोफत चटणी आणि भाकरीचे वाटप - janvikas sangh roti and sauce

बहुसंख्य कामगार हे खेड्यापाड्यातून आले असल्याने आपण भाकर आणि चटणी निवडली असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले. कडक भाकरी ही किमान १५ दिवस टिकते. २५ महिला आणि ५० कार्यकर्त्यांच्या मदतीने दररोज ५०० भाकरी बनवल्या जात आहेत. अडीचशे लोकांपर्यंत हे खाद्यपदार्थ पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले.

corona pimpri chinchwad
गरजूंना देण्यात येणारी भाकर
author img

By

Published : Apr 2, 2020, 1:52 PM IST

पुणे- जगभरात करोना विषाणूने आपली पायेमुळे रोवली आहे. कोरोनाचे संकट दूर व्हावे अशी नागरिकांकडून देवाला प्रार्थना होत आहे. या काळात लॉकडाऊनमुळे गरीब लोकांनी आपले रोजगार गमवले आहेत. त्यांचे खायचे वांदे झाले आहे. भूकेने व्याकूळ असलेल्या अशा लोकांना पिंपरी-चिंचवड शहरातील मराठवाडा जनविकास संघाने जेवण पुरविले आहे.

माहिती देताना मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार आणि दत्तात्रेय धोंडगे

जनविकास संघाकडून गरजूंना शेंगदाण्याची चटणी आणि भाकर पुरवली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. राज्यासह देशातील अनेक कामगार या ठिकाणी नौकरी करतात. मात्र, करोना विषाणूचे संकट अचानक धडकल्याने कामगार बेरोजगार झाले आहेत. यामुळे त्यांच्या जेवनाचे वांदे झालेत. अशा वेळी समाजिक जबाबदारी पाळत काही लोक आणि संस्थ्या गरिबांना अन्न पुरवण्यासाठी पुढे आले आहे. यातीलच मराठवाडा जनविकास संघाचे अरुण पवार हे गेल्या तीन दिवसांपासून गरिबांना भाकरी आणि चटणी देण्याचे काम करत आहे.

बहुसंख्य कामगार हे खेड्यापाड्यातून आले असल्याने आपण भाकर आणि चटणी निवडली असल्याचे पवार यांनी सांगितले. कडक भाकरी ही किमान १५ दिवस टिकते. २५ महिला आणि ५० कार्यकर्त्यांच्या मदतीने दररोज ५०० भाकरी बनवल्या जात आहेत. अडीचशे लोकांपर्यंत हे खाद्यपदार्थ पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे अरुण पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर, देशातील परिस्थिती बघता दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा- खबरदार..! विनाकारण घराबाहेर पडाल तर होणार कारवाई; पोलीस ठेवतायेत ड्रोन क‌ॅमेऱ्यातून नजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.