ETV Bharat / state

अपंग शिक्षिकेची पदोन्नतीसाठी दहा लाखांची फसवणूक; भामट्याने 'या' मोठ्या नेत्यांच्या नावाचा केला वापर - NCP leader Ajit Pawar

अपंग शिक्षिकेला पदोन्नती मिळवून देतो, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझी ओळख असल्याचे सांगून फसवणूक ( Fraud of 10 Lakhs for Promotion of Disabled Teacher ) केल्याप्रकरणी डॉ. कृष्णा शेषराव जेवादे (रा. बारामती) व सोमनाथ इंगळे (रा. सोमवार पेठ, फलटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्मिता विश्राम वाघोले (रा. राऊ कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे) या शिक्षिकेने फिर्याद दिली.

Fraud of 10 Lakhs for Promotion of Disabled Teacher Liar Used Name of These Big Leaders
अपंग शिक्षिकेची पदोन्नतीसाठी दहा लाखांची फसवणूक
author img

By

Published : Dec 1, 2022, 8:13 PM IST

बारामती : एका अपंग शिक्षिकेला पदोन्नती मिळवून देतो, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझी ओळख असल्याचे ( NCP Leader Ajit Pawar Gets Promotion for a Disabled teacher ) सांगून फसवणूक ( Fraud of 10 Lakhs for Promotion of Disabled Teacher ) केल्याप्रकरणी डॉ. कृष्णा शेषराव जेवादे (रा. बारामती) व सोमनाथ इंगळे (रा. सोमवार पेठ, फलटण, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्मिता विश्राम वाघोले (रा. राऊ कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे) या शिक्षिकेने फिर्याद दिली.

फिर्यादीनुसार, वाघोले या पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून २००१ पासून काम करतात. २०२१ साली त्या गुडघेदुखीवरील उपचारासाठी बारामतीतील विश्वजित हॉस्पिटल येथे आल्या होत्या. तेथे डॉ. कृष्णा जेवादे व त्यांचा कंपाऊंडर सोमनाथ इंगळे यांच्याशी त्यांची ओळख झाली. डॉ. जेवादे यांनी त्यावेळी शिक्षिकेची विचारपूस केली. त्यांना अस्थिव्यंग असल्याचे डॉ. जेवादे यांना समजले. त्याने तुम्ही अस्थिव्यंग असताना तुम्हाला शिक्षणप्रमुखपदी पदोन्नती कशी मिळाली नाही, माझी राष्ट्रवादीचे नेते व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी ओळख असल्याचे सांगत त्यांच्यासोबतचे फोटो दाखवले. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला.

पदोन्नतीसाठी पैसे द्या, मी तुमचे काम करतो, असे त्याने सांगितले. त्यापोटी दहा लाखांची मागणी केली. त्यापैकी सुरुवातीला तीन लाख रुपये फिर्यादीने फोन पेद्वारे पाठवले. डॉ. जेवादे याने आणखी पैशांची मागणी केली. त्यानुसार इंगळे याला पुण्यात मनपा शाळेत पाठवत तेथे फिर्यादीकडून दीड लाख रुपये रोख घेण्यात आले. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी जेवादे याने संपर्क करीत तुमचे काम होत आले आहे, आणखी साडेपाच लाख रुपये लागतील, असे सांगत त्यांना मुलाखतीसाठी बारामतीला बोलावले.

त्यावेळी फिर्यादीने आणखी साडेपाच लाखांची रक्कम रोख स्वरूपात दिली. दोन ते तीन महिन्यांत काम होईल, काम झाले नाही तर पैसे परत करतो, असे जेवादे याने सांगितले होते. पैसे देऊन बराच कालावधी लोटला तरी काम होत नसल्याने फिर्यादी यांनी त्यांना फोनवर संपर्क केला. त्यावर तुमची ऑर्डर तयार आहे, लवकरच ती मिळेल असे सांगत त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पुन्हा काही महिन्यानंतर त्याचा फोन लागणे बंद झाले. व्हाॅटसअॅपवर मेसेज केल्यावर तुमचे पैसे लवकरच देतो, असे त्याने सांगितले. परंतु काम न करता फसवणूक केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.