ETV Bharat / state

मध्यप्रदेशमध्ये केली फसवणुक, संशयीताला बारामतीतून अटक

author img

By

Published : Jul 16, 2021, 8:48 PM IST

भोपाळ येथील एका कंपनीचा पंजाब नॅशनल बँकेचा चेक आडीबीआय बँकेतील मॅनेजरच्या मदतीने, ओडीसामधील व्यक्तीच्या करंट आकाउंटवर टाकून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा चेक १८ कोटी ५० लाख रूपयांचा आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

बारामती पोलिसांसह ताब्यात घेतलेला संशयीत

बारामती - मध्यप्रदेश भोपाळ येथील एका कंपनीचा पंजाब नॅशनल बँकेचा चेक आडीबीआय बँकेतील मॅनेजरच्या मदतीने, ओडीसामधील व्यक्तीच्या करंट आकाउंटवर टाकून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा चेक १८ कोटी ५० लाख रूपयांचा आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी बारामतीतून एकाला अटक केली आहे. योगेश अजित काटे (रा. काटेवाडी ता. बारामती जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मध्यप्रदेश येथे गुन्हा दाखल

दिलीप बिल्डकॉन लिमिटेड भोपाळ या कंपनीचा पंजाब नॅशनल बँकेतील १८ कोटी ५० लाख रूपयांचा चेक क्लोनिंग केला आहे. हे चेक आयडीबीआय बँकेच्या मॅनेजरच्या मदतीने ओडीसा येथील एका इसमाच्या करंट आकाउंटवरती टाकून फसवणूक केला आहे. याबाबत स्पेशल टास्कफोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) येथे गुन्हा दाखल होता. सदर, गुन्ह्यातील व्यक्ती आयडीबीआय बँकेचा मॅनेजर सरोज महापात्रा याला यापुर्वी अटक केली आहे. मात्र, आरोपी योगेश काटे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी एसटीएफ भोपाळ येथील तपास पथकाने बारामती तालुका पोलीस ठाण्याकडे मदत मागितली होती. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारावरून योगेश काटे याला (मोरगाव रोड ता. बारामती) येथून ताब्यात घेतले.

पुढील तपासासाठी स्पेशल टास्क फोर्सकडे

ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला पुढील तपासासाठी स्पेशल टास्क फोर्स भोपाळ (मध्यप्रदेश) यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, डॉ. अभिनव देशमुख, मिलिंद मोहीते, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी, महेश ढवाण पोलीस निरीक्षक, सह. पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे, पोलीस नाईक बंडगर, पोलीस अंमलदार कांबळे व पोलीस अंमलदार सपकळ, महिला पोलीस अंमलदार काळे यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.