पुणे - आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथे दहा शेतकऱ्यांच्या १४ एकर ऊसशेतीला काल(15 जानेवारी) दुपारच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे शेतकऱ्यांचे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
हेही वाचा - हिंदी सिने कलाकारांच्या कारचे डिझाइन बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग
सध्या सर्वत्र ऊस काढणीला आला असुन ऊसतोडही सुरु आहे. काल दुपारच्या सुमारास अचानक ऊसाला आग लागली. ऊस काही प्रमाणात वाळलेला असल्याने आग झपाट्याने पसरली. दरम्यान, भिमाशंकर कारखान्याचे ऊस तोड मजुर व स्थानिक शेतकऱ्यांच्या मदतीने विद्युत मोटर सुरू करून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न करण्यात आला. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने मोठ्या प्रमाणात ऊसाचे नुकसान झाले. अखेर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने बाजूच्या शेतांमधील ऊस वाचला आहे.