पुणे - शहराजवळ असलेल्या खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कार कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयत व्यक्तीमध्ये तीन मुली आणि आईचा समावेश आहे. तर वडील पोहून बाहेर आल्यामुळे त्यांचा जीव वाचला. पानशेत रस्त्यावरील खडकवासला धरण परिसरात शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
अल्पना विठ्ठल भीकुले (वय 45 रा. वीहीर, सध्या रा. चव्हानगर, धनकवडी), प्राजक्ता भीकुले (वय 21), प्रणिता भीकुले (वय 17) व वैदेही भीकुले (वय 8) अशी मृत्यू झालेल्याची नावे आहेत. तर वडील विठ्ठल केशव भिकुले (वय 46) हे बचावले आहेत. या प्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, भिकुले कुटुंबीय हे मूळचे वेल्हा तालुक्यातील विहीर गावचे आहेत. विठ्ठल भीकुले गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील धनकवडीत राहतात. काही कामानिमित्त ते तीन दिवसांपूर्वी मूळ गावी गेले होते. कुटुंबासह ते त्यांच्या कारमधून शुक्रवारी परत पुण्याकडे येत होते. यावेळी अचानक कार उरण फाटा येथे आल्यानंतर नागमोडी रस्त्यावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार बॅक वॉटरमध्ये कोसळली. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी नांदेड सिटी येथील अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधकार्य राबवून यातील चार ही जणांचे मृतदेह बाहेर काढले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवान सुजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधकार्य मोहिम राबवली.
नियंत्रण सुटल्याने कार खडकवासला धरणात कोसळली; 3 मुलींसह आईचा बुडून मृत्यू - khadakwasla dam news
खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमध्ये कार कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयत व्यक्तीमध्ये तीन मुली आणि आईचा समावेश आहे.