ETV Bharat / state

पुन्हा नकोशी.! शिरूरमध्ये नवजात अर्भकला जन्मदात्यांनीच सोडले बेवारस

चार ते सहा दिवसांपुर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक शिरूर तालुक्यातील निमोणे गावात जन्मदात्यांनीच सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्यांनी नकोशी म्हणून सोडून दिलेल्या अर्भकाचा आवाज स्थानिक नागरिकांच्या कानावर पडताच मदतीचा हात पुढे करत या मुलीला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्त्री जातीचे अर्भक
author img

By

Published : Sep 22, 2019, 10:02 AM IST

पुणे- पोटी आलेली मुलगी जन्मदात्यांनाच नकोशी झाली आहे. चार ते सहा दिवसांपूर्वी जन्म घेतलेले स्त्री जातीचे अर्भक शिरूर तालुक्यातील निमोणे गावात जन्मदात्यांनीच सोडून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बेवारस सोडून देण्यात आलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

जन्मदात्यांनी नकोशी म्हणून सोडून दिलेल्या अर्भकाचा आवाज स्थानिक नागरिकांच्या कानावर पडताच मदतीचे हात पुढे करत या मुलीला प्रथमोपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिरूर पोलिसांकडून अज्ञात जन्मदात्या आई-वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार तिच्या आई-वडिलांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. 'मुलगी वाचवा, देश वाचेल' असा नारा देशभरात दिला जातो. मात्र, प्रत्यक्षात या संदेशाचे किती पालन केले जात आहे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. जन्मलेली मुलगी नकोशी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे.

Intro:Anc__सुंदर जगाचे विश्व अनुभवाला आलेली मुलगीच जन्मदात्यांनाच नकोशी झालीय चार ते सहा दिवसांपुर्वी जन्म घेतलेले स्त्री जातीचे अर्भक शिरुर तालुक्यातील निमोणे गावात जन्मदात्यांनीच सोडुन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने बेवारस सोडुन देण्यात आलेल्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन तीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

जन्मदात्यांनी "नकोशी" म्हणुन सोडुन दिलेल्या अर्भकाचा गोड आवाज स्थानिक नागरिकांच्या कानावर पडताच अनेकांनी मदतीचे हात पुढे करत या मुलीला प्रथमोपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन शिरुर पोलीसांकडुन अज्ञात जन्मदात्या आई-वडीलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे त्यानुसार तीच्या आई वडीलांचा पोलीसांकडुन शोध सुरु आहे

मुलगी वाचवा, देश वाचेल" असा नारा देशभरात दिला जातो. मात्र प्रत्यक्षात या संदेशाचं किती पालन केलं जात? हा प्रश्न अनुत्तरितच आहे. जन्मलेली मुलगी नकोशी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहेत. Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.