ETV Bharat / state

Fort House Pune : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारा 'मावळा'; बांधले थेट किल्ल्यासारखे घर - Fort House

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव (Fort House in Khamgaon) परिसरात राहणाऱ्या निलेश पंढरीनाथ जगताप या युवकाने येणाऱ्या पिढीला गड किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती व्हावी व छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj Fort ) वारसा जपण्यासाठी किल्ला स्वरूपाचे घर बांधले ( Fort House Pune ) आहे. हे घर बांधण्यासाठी जवळपास १ कोटी रुपये इतका खर्च आला असून हे घर बांधायला दोन वर्षांचा कालावधी लागला. तसेच या घराला आतून सर्व पारंपारिक वाड्यासारखा लूक देण्यात (Build Fort House in Pune) आला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 13, 2022, 6:51 PM IST

युवकाने किल्ला स्वरूपाचे बांधलेले घर

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj Fort ) यांचा इतिहासावर विविध चर्चा तसेच इतर पक्षातील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केला जात आहे. याविरोधात राज्यातील विविध संघटनाच्या वतीने आंदोलन देखील केले जात आहे. राज्यात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबाबत तसेच त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने विधाने केली जात आहेत. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव परिसरात राहणाऱ्या निलेश पंढरीनाथ जगताप या युवकाने येणाऱ्या पिढीला गड किल्ल्यांच्या इतिहासाची माहिती व्हावी, यासाठी त्याने चक्क किल्ल्याच्या आकाराचे घर बांधले ( Fort House in Pune ) आहे.

घर बांधण्यासाठी 1 कोटींचा खर्च : छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी निलेश पंढरीनाथ जगताप या युवकाने हे गडकिल्ल्यांच्या स्वरूपात घर बांधले आहे. निलेश जगताप हे शेतकरी कुटुंबातील असून तो व्यवसायाने पशुवैद्य आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा भक्त आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे चालावा यासाठी माझ्या डोक्यात घर बांधण्याची संकल्पना आली. हे घर बांधण्यासाठी जवळपास १ कोटी रुपये इतका खर्च आला असून हे घर बांधायला दोन वर्षांचा कालावधी लागला. तसेच या घराला आतून सर्व पारंपारिक वाड्यासारखा लूक देण्यात आला असून घराचे छत उतारा सारखे करण्यात आला आहे.

छत्रपतींचा वारसा पुढे चालवा : मला लहानपणापासून किल्ले बनवण्याची, किल्ल्यांवर फिरायला जाण्याची आवड होती. त्यामुळे लहान पणापासूनच महाराजांच्या विचारांचा वारसा असल्याने मी हे घर बांधले आहे, असे यावेळी जगताप याने सांगितले आहे. की, येणाऱ्या पिढ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालावावा आणि शिवाजी महाराजांचा विचार पुढे न्यावा हा घर बांधण्याचा उद्देश आहे. ही वास्तू मी पंचतारांकित वास्तूप्रमाणे तयार केली असून छत्रपतींचा वारसा यातून जपला जाणारा असल्याचा देखील यावेळी निलेश जगताप याने सांगितले आहे.

Fort House Pune
किल्ला स्वरूपाचे बांधलेले घर

किल्ले स्वरूपाचे घर : निलेश जगताप याने जे गडकिल्ल्यांच्या स्वरूपात घर बांधले आहे. त्या घराच्या बाहेरील बाजूस ऐतिहासिक किल्ल्यासारखा दिसणारा चिरा जांभा दगड लावण्यात आला आहे. निलेश यांनी हा दगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील पावस येथून आणला असून त्या घराच्या चारही बाजूंना बुरुंजाचा आकार देण्यात आला आहे. तसेच प्रवेश द्वारा जवळ स्वागत कमान देखील बांधण्यात आली आहे. बाहेरच्या बाजुला कंदिलाच्या आकारांचे दिवे लावण्यात आले आहेत. तसेच घराच्या बाजूने बाग देखील फुलवण्यात आली आहे. या घराचा दरवाजा हा महाकाय बनवण्यात आला आहे. तसेच महाराजांच्या काळात असणारे पारंपारिक तुळशी वृंदावन देखील उभारण्यात आले आहे.

घर पाहण्यासाठी येतात लोकं : हे घर जवळपास २५७७ स्वकेर फुटमध्ये बांधण्यात आले आहे. घराच्या आतमध्ये देवघर, सभागृह, ३ बेड, किचन, स्टोअर रुम, बाथरुम एखाद्या पंचतारांकीत हॉटेलमधील वास्तूप्रमाणे बांधण्यात आल्या आहेत. किचनमध्ये धुर बाहेर जाण्यासाठी आयलॅंड चिमणी व अत्याधुनिक बेल कॅमेरा बसवण्यात आला आहे. हे किल्ल्यास्वरूप बांधलेले घर पाहण्यासाठी जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील इतर लोक देखील हे घर पाहण्यासाठी येत आहे. येणाऱ्या पिढीला गड किल्ल्यांबाबत माहिती व्हावी, यासाठी हे घर बांधण्यात आले आहे, असे देखील यावेळी जगताप याने सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.