पुणे - कलम ३७० रद्द करण्यास सरकारने मोठी हिम्मत दाखवली. परंतु, या आधीच हा निर्णय व्हायला हवा होता, असे मत माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी व्यक्त केले आहे. कलम ३७० रद्दसंदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.
ते म्हणाले, कलम ३७० रद्द करणे ही मोठी आनंदाची बाब. परंतु, हे फार पूर्वीच रद्द करणे गरजेचे होते. या सरकारने हा निर्णय घेतला ही महत्त्वाची बाब आहे. तर आता काश्मीरच्या जनतेला समजावून सांगणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आता सरकारला न्यायालय, काश्मीर जनता, आंतरराष्ट्रीय स्तर तसेच भारतातील स्थानिक परिस्थिती अशा ४ पातळ्यांवर लढाई लढावी लागेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले. यासंदर्भात आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली बातचीत पाहण्यासाठी क्लिक करा.