पुणे - खेड तालुक्यातील एसईझेडमध्ये (सेझ) शुक्रवारी दुपारच्या सुमारास धारदार हत्याराने वार करून माजी सरपंचाची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवनाथ झोडगे असे हत्या झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. राजगुरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा - संतापजनक..! पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; खून करून सावत्र बाप फरार
राजगुरूनगरपासून काही अंतरावर खेड सिटी येथे सेझमध्ये मोठ्या प्रमाणात देशी विदेशी कंपन्यांचा विस्तार वाढला आहे. त्यातूनच या परिसरात ठेकेदारीचे मोठे प्रस्त वाढत आहे. त्यामुळे येथे गुन्हेगारीने तोंड वर काढले आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात हाणामारी, धमकावणे, अशा घटना घडल्या आहेत. नवनाथ यांच्या हत्येमुळे सेझ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा - मंचर-बेल्हे रस्त्यावर पिकअप-रिक्षाचा अपघात, तिघांचा मृत्यू
नवनाथ हे एका कंपनीत सुपरवाझर म्हणून काम करत होते. मात्र, दुपारच्या सुमारास नवनाथ यांच्यावर काही तरुणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही हत्या ठेकेदारीतील वादातून झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राजगुरुनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके रवाना झाली आहेत.