पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद आहेत. सर्व कामधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आहवानानुसार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या सूचनेनुसार पुण्यात भाजप नगरसेवक हे गरजूंना धान्य वाटप करत आहेत.
हेही वाचा- न्यूयॉर्क शहरात मागील 24 तासामध्ये तब्बल 731 मृत्यू
पुणे महानगरपालिका सभागृह नेते धीरज घाटे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक २९ मधील ५ हजार गरजू नागरिकांना अन्न धान्य वाटप करण्यात येत आहे. दांडेकर पूल, दत्तवाडी, आंबील ओढा, पर्वती दर्शन, लक्ष्मी नगर, राजेंद्रनगर, सानेगुरुजीनगर, जोशीवाडा, मासेआळी या भागातील अनेक गरजू कुटुंबांपर्यंत गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल असे १० हजार किलो पेक्षा जास्त धान्य वाटप करण्यात आले आहे. अनेक कुटुंबांपर्यंत मदत पोहचली आहे. गरजू , हातावर पोट असलेले तळागाळातील सर्व नागरिकांपर्यंत मदत पोहचून त्यांना मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक धीरज घाटे यांनी दिली.