ETV Bharat / state

Folding Electric Cycle : पुण्यातील प्राध्यापकानं बनवली संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल! - इलेक्ट्रिक फोल्डिंग सायकल

Folding Electric Cycle : पुण्यातील प्राध्यापक मंदार पाटील यांनी एक इलेक्ट्रिक सायकल बनवली आजे, जी पूर्णपणे फोल्ड होते. देशात पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता या इलेक्ट्रिक सायकलकडे भविष्यातील एक पर्याय म्हणून पाहिलं जात आहे. वाचा ही स्पेशल स्टोरी...

Folding Electric Cycle
Folding Electric Cycle
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2023, 10:01 PM IST

पाहा व्हिडिओ

पुणे Folding Electric Cycle : पेट्रोल-डिझेलचा वाढता भाव पाहता त्याला पर्याय म्हणून देशात इलेक्ट्रिक वाहनांचं चलन वाढलंय. या इलेक्ट्रिक वाहनांबरोबर बाजारात आता इलेक्ट्रिक सायकलही दाखल झाली आहे.

भारतीय बनावटीची फोल्डिंग इलेक्ट्रिक सायकल : पुणे शहराची ओळख पूर्वी सायकलींचं शहर अशी होती. आता या शहरातील एका प्राध्यापकानं संपूर्ण भारतीय बनावटीची फोल्डिंग इलेक्ट्रिक सायकल बनवली आहे. ही सायकल एकावेळी कमीत कमी २५ ते ३० किलोमीटर अंतर कापू शकते. पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे प्राध्यापक असलेले मंदार पाटील यांनी ही सायकल बनवली असून, ती पूर्णपणे फोल्ड देखील होते.

तीन वर्ष मेहनत घेतली : ४० वर्षीय मंदार पाटील यांनी तीन वर्ष मेहनत घेऊन या सायकलचं डिझाइन तयार केलं. त्यांनी घराजवळच्या कारखान्यात या सायकलची निर्मिती केली आहे. सायकलचं वजन १३ किलो असून यात चार प्रकारचे मॉडेल आहेत. मेबन मोबिलिटी इनोव्हेशन नावाच्या स्टार्टअपद्वारे या सायकलची निर्मिती होतं आहे. यासाठी त्यांनी भारत सरकारकडून पेटंट देखील मिळवलंय.

मी ज्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो त्या कॉलेजचा कॅम्पस खूप मोठा आहे. तेथील अनेक विद्यार्थी दुचाकीचा वापर करतात. त्यामुळे कॅम्पसमध्ये सगळीकडे दुचाकींची गर्दी दिसते. कॉलेजमध्ये सायकलस्वारांसाठी स्टँडची सुविधा नसल्यानं सायकल वापरण्याचं प्रमाण कमी होतं. यावर उपाय म्हणून मी फोल्ड करून बरोबर नेता येईल अशा सायकलची निर्मिती करण्याचा विचार केला आणि ही सायकल बनविली. - मंदार पाटील

सायकल कुठेही सोबत घेऊन जाता येते : मंदार पाटील पुढे म्हणाले की, 'जेव्हा मी ही सायकल बनवली तेव्हा वाटलं की ही सायकल इलेक्ट्रिक असावी. त्यानंतर काही दिवसांपूर्वी मी तिच्यात इलेक्ट्रिक डिवाईस बसवला. यामुळे ही सायकल कमीत कमी २५ ते ३० किलोमीटर, तर पायडलचा वापर केला तर जास्तीत जास्त ४० ते ५० किलोमीटर अंतर कापू शकते. या सायकलचं वैशिष्ट्य म्हणजे ती फोल्ड देखील करता येते. त्यामुळे आपल्याला जर एखाद्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर ही सायकल सोबत घेऊ जाता येते, असं त्यांनी सांगितलं.

५० पेक्षा अधिक सायकल बनवल्या : ते पुढे म्हणाले की, आज आमच्या कॅम्पसमध्ये अनेक विद्यार्थी ही सायकल वापरत आहेत. तसेच अनेक लोक बसनं प्रवास करताना देखील ही सायकल सोबत घेऊन जात आहेत. मी आतापर्यंत अशा ५० पेक्षा अधिक सायकल बनवल्या असून त्या सहजरित्या फोल्ड करून कुठेही घेऊन जाता येतात. विशेष म्हणजे ही सायकल पाहिजे तशी अ‍ॅडजस्ट देखील होते, असं मंदार पाटील यांनी सांगितलं.

भविष्यातील पर्याय : व्यायामाबरोबरच आर्थिक बचत आणि प्रदूषणमुक्ती अशा फायद्यांमुळे सायकल चालवण्यास जगभर प्रोत्साहन दिलं जातं. मात्र प्रत्येक ठिकाणी सायकल स्टॅंड उपलब्ध नसल्यानं सायकल कुठे ठेवायची हा प्रश्न सायकलस्वारांना पडायचा. मात्र आता ही अडचण या सायकलनं सहज दूर होणार असून, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर पाहता या इलेक्ट्रिक सायकलकडे भविष्यातील एक पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.

हेही वाचा :

  1. Special Story : टाकाऊ वस्तूंपासून बनवले 'थ्री इन वन' इंडिकेटर, खर्च केवळ 70 रुपये!, वाचा स्पेशल स्टोरी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.