पुणे - देशभरात मंगळवारी दसरा सण साजरा होत आहे. त्यासाठी कारागीर विविध आकारातील हार तयार करण्यात मग्न आहेत. मात्र, या दसऱ्यावर मंदीचे सावट पाहायला मिळत आहे. फुलांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
हे वाचलं का?- ...घरात लक्ष्मीचा वास राहावा म्हणून नागरिक पाळतात 'ही' प्रथा
नवरात्र, दसरा, दिवाळी असे सण डोळ्यासमोर ठेवून शेतकरी फुलांची लागवड करत असतो. मात्र, अवकाळी पाऊस व वातावरणातील बदल यामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच फुलांना योग्य बाजारभाव देखील मिळत नाही. दुसरीकडे दिवसरात्र मेहनत घेणारे हार कारगीरांना फुलांच्या हारांची योग्य किंमत मिळत नाही. फुलांची खरेदी व मजुरी पाहता हातात काहीही मिळत नाही. मात्र, व्यवसाय टिकविण्यासाठी काम करावे लागत असल्याचे व्यापारी सांगतात.
हे वाचलं का? - हिंगोली येथे नवरात्रोत्सवास प्रारंभ; मुख्य आकर्षण असलेल्या दसरा महोत्सवाची तयारी सुरू
प्रत्येक घरात दसरा, दिवाळी आनंदात साजरी केली जावी यासाठी शेतकरी, हार कारगीर मोठ्या मेहनतीने दिवसरात्र काम करीत असतात. मात्र, या सणांमध्ये फूल उत्पादक, हार कारागीर, हार विक्री करणाऱ्या सर्वांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.