ETV Bharat / state

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळावा...शेतकऱ्यांची मागणी - farmers demands for instant relief

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासोबतच सरसकट कर्जमाफीचे आश्वासन शिवसेनेमार्फत देण्यात आले होते. आता खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्याने या आश्वासनांची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

farmers from baramati demands for instant relief
उद्धव ठकरेंनी दिलेला शब्द पाळावा...शेतकऱ्यांची मागणी
author img

By

Published : Dec 2, 2019, 11:39 AM IST

पुणे - अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची पाहाणी करण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱयांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासोबतच सरसकट कर्जमाफीचेही आश्वासन देण्यात आले. आता खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री झाल्याने या आश्वासनांची लवकर पूर्तता व्हावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

उद्धव ठकरेंनी दिलेला शब्द पाळावा...शेतकऱ्यांची मागणी

पश्चिम महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब, कांदे,आदी पिके भूई सपाट झाली. निवडणुकीच्या निकालानंतर वेळेत सरकार स्थापन झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मदत देखील जाहीर करण्यात आली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे नव्या सरकारने लवकरात लवकर मदत पुरवण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी, पिंपळी, दंड वाडी, काटेवाडी, सुपा, आदी भागात अवकाळी पावसाने नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहाणी करुन पंचनामे केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. यामुळे नवीन सरकारने तत्काळ रक्कम खात्यावर जमा करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

Intro:Body:बारामती..
सरसकट कर्जमाफी देऊन दिलेला शब्द पाळावा... शेतकऱ्यांची मागणी..
 
सध्याच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे  आतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पहिले राजकीय नेते म्हणून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या भेटीसाठी बाहेर पडून नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. या पाहणीत संपूर्ण मराठवाडा पिंजून काढत व शेतकऱ्यांना दिलासा देत, त्यांच्याशी संवाद साधून सातबारा कोरा करणार, सरसकट कर्जमाफी देऊ अशी आश्‍वासने दिली होती... आता खुद्द उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असल्याने  या आश्‍वासनांची पूर्तता होईल अशी आस धरून शेतकरी बसले आहेत..
 
विधानसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या..महाराष्ट्रातील जनतेने भाजप आणि शिवसेनेला बहुमत दिले होते.. मात्र त्यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या अंतर्गत वादामुळे त्यांची तीस वर्षाची युती संपुष्टात आली. आणि  राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना यांच्यात आघाडी स्थापन करण्याचा  ऐतिहासिक निर्णय  घेण्यात आला ..
 
एन दिवाळीच्या काळात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले होते..आणि शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले. अनेक शेतकऱ्यांच्या   ज्वारी, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष, डाळिंब आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. निवडणूक निकाल होऊनही वेळेत सरकार स्थापन होऊ न शकल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांकडून शेतकऱ्यांना दिलासा म्हणून मदत देखील जाहीर करण्यात आली होती. मात्र जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची भावना ेशेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. आता सरकार स्थापन झाले असून शेतकऱ्यांच्या नुकसानीला योग्य तो मोबदला मिळावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जाऊ लागली आहे..
 
बारामती तालुक्यातील भोंडवे वाडी, पिंपळी, दंड वाडी, काटेवाडी, सुपा सह आदी भागात अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त  शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून पंचनामे केले आहेत. मात्र अद्याप शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. सध्या सरकार स्थापन झाले आहे शेतकऱ्यांच्या पंचनाम्याची दखल घेत लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची भावना आहे..
 
……………………………………………………
 
शेतक-यांच्या प्रतिक्रिया-
शरद पवार, उध्दव ठाकरे यांनी आम्हांला शब्द दिला होता की, शेतक-यांची कर्जमाफी करु, आमचे मागील दुष्काळ आणि आत्ताच्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तरी आम्हांला लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन कर्जमाफी करावी. आणि दिलेला शब्द खरा करुन दाखवावा.
विश्वास गावडे- गुणवडी ता. बारामती
 
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांचे सरकार सत्तेवर आले आहे. हे सरकार नक्कीच शेतक-यांचे हीत साधेल अशी अपेक्षा आहे. या सरकारने शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करावी अशी मागणी आहे.
रामदास वायाळ, शेतकरी.
 
 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.