शिरुर (पुणे) - विविध मतदारसंघातील आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी विशेष निधीची घोषणा केली आहे. पण, पुणे जिल्ह्यातील शिरुर येथे तालुका वारकरी संघटनेने ग्रामपंचाय बिनविरोध केल्यास पुढील पाच वर्षे त्या गावातील दिंडी सोहळा, सप्ताहाला भजनी साहित्य मोफत देऊन किर्तन, प्रवचनाचे कार्यक्रमात विना मानधनाचे करणार असल्याचे जाहीर केले आहे.
यासाठी तहसिलदार लैला शेख यांना निवेदनातून वचनपत्र देण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प. सुभाष महाराज गावडे वारकरी संघटना अध्यक्ष व तालुक्यातील सर्व किर्तनकार महाराज उपस्थित होते.
गाव पातळीवर होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत गट-तट, भांड-तंटे, मोठे वाद उफाळून येतात. यामुळे अनेक गावातील शांतता भंग होते. हे वाद होऊ नयेत गावात शांतता नांदावी यासाठी जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन वारकरी संघटनेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाची उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली बैठक
हेही वाचा - म्हणून आता 'गो कोरोना गो' नव्हे, तर 'नो कोरोना नो'...रामदास आठवले म्हणाले