ETV Bharat / state

चाकण उद्योगनगरीत तरुणावर गोळीबार, उपचार सुरू - पुणे

गेल्या २ दिवसांपूर्वी संकेतचे चाकणमधील काही तरुणांसोबत भांडण झाले होते. त्या वादातून संकेत बचावला होता. मात्र, त्या तरुणांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास खंडोबा माळ येथे संकेतला गाठले.

हल्ला झालेला तरुण
author img

By

Published : May 28, 2019, 3:07 PM IST

पुणे - शहरातील चाकण औद्योगीक नगरीत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणावर गोळीबार झाला. यामध्ये गोळी तरुणाच्या पायाला स्पर्श करून गेली. त्यामुळे तो थोडक्यात बचावला. संकेत गाडेकर, असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे.

चाकण औद्योगीक परिसर

संकेत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. गेल्या २ दिवसांपूर्वी संकेतचे चाकणमधील काही तरुणांसोबत भांडण झाले होते. त्या वादातून संकेत बचावला होता. मात्र, त्या तरुणांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास खंडोबा माळ येथे संकेतला गाठले. त्याच्यावर कोयत्याने वार केला. मात्र, संकेतने पळ काढला. त्यामुळे त्या तरुणांनी गोळीबार केला. यामध्ये गोळी त्याच्या पायाला स्पर्श करून गेली. सध्या त्याच्यावर पिंपरी-चिंचवड येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चाकण उद्योगनगरीत गँगवार कसे संपणार?

काहीच दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड आयुक्तालय तयार झाले आहे. त्यामध्ये चाकण उद्योगनगरी परिसराचा समावेश करण्यात आला आहे. या परिसराला सक्षम पोलीस दल मिळाले असताना अल्पवयीन, तरुण वयातील अनेक मुले गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत. धारदार हत्यारे, गावठी कट्टे यांचा सर्रास वापर होताना दिसत आहे. पोलीस काही प्रमाणात कारवाई करतात. मात्र, ही गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. यावर निर्बंध आणण्यासाठी पोलीस काय उपाययोजना करतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Intro:Anc__ चाकण औद्योगिक नगरी संपूर्ण जगाच्या नकाशावर औद्योगिक हब म्हणून उदयास आली आणि एक वेगळी ओळख बनवली मात्र या उद्योगनगरीला आता गँगवारची नजर लागली असून दिवसा-रात्री गोळीबार होऊ लागले आहे अशीच घटना चाकण उद्योगनगरीत मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून एका तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार झाला यामध्ये तरुणाच्या पायाला चाटून गुढी गेल्याने तो बचावला संकेत गाडेकर असे गोळीबार झालेल्या तरुणाचे नाव

चाकण उद्योगनगरीमध्ये गॅंगवारच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत या टोळ्यांकडून अनाधिकृतपणे गावठी कट्ट्याचा वापर सर्रास होत असताना टोळी युद्धात वर्चस्वाची लढाई सुरू आहे

काल रात्रीच्या सुमारास एकमेकांच्या वर्चस्वावरून संकेत गाडेकर या तरुणावर गोळीबार झाला संकेत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे तर त्याच्यावर हल्ला करणारेही गुन्हेगार असल्याचे बोलले जात असुन चाकण पोलीसांकडुन तपास सुरु आहे

दोन दिवसांपुर्वी संकेतचे चाकण मधील काही तरुणांमध्ये वाद झाला होता त्यावादावादीतुन संकेत बचावला होता मात्र काल मध्यरात्रीच्या सुमारास संकेतला खंडोबा माळ येथे गाठलं. तिथं कोयत्याने वार केला, ते पळू लागला म्हणून गोळीबार केला यात त्याच्या पायाला गोळी चाटून गेली. त्याच्यावर पिंपरीचिंचवड येथील वायसीएम रुग्नालयात उपचार सुरू आहे

चाकण उद्योगनगरीत गँगवार कसं संपणार...

काहीच दिवसांपुर्वी पिंपरी चिंचवड आयुक्तालय उभं राहलं त्यामध्ये चाकण उद्योगनगरी परिसराचा समावेश केला पोलीस दल सक्षम मिळाले असताना अल्पवयीन,तरुण वयातील अनेक मुले गुन्हेगारीकडे वळु लागली आहे धारदार हत्यारे,गावठी कट्टे,सोशल मीडियावर चालणारी वर्चस्वाची लढाई हे सर्व काही दिसत असताना पोलीस काही प्रमाणात कारवाई करतात मात्र हि गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे यावर निर्बंध आणण्यासाठी पोलीस काय उपाययोजना करतात हेच पुढील काळात पहावे लागणार आहे.Body:...Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.