पुणे - धायरी परिसरात असलेल्या स्मॉल स्केल कारखान्यांना आग लागून चार कारखान्याचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. आज (बुधवारी) दुपारी ही घटना घडली. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे.
3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण
धायरी भागात असलेल्या अभिनव कॉलेज रस्ता येथे, फुगे आणि कागदी डेकोरेशन तयार करणाऱ्या कारखान्याला सकाळी अकराच्या सुमारास आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच पुणे मनपा अग्निशमन केंद्राचे जवान आणि PMRDA अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या जवानांनी आठ फायर गाड्यांच्या सहाय्याने आग विझवण्याचे काम सुरू केले. 3 तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या परिसरात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे, धायरी नर्हे परिसरात टेकड्यांवर हा भाग असून अरुंद रस्ते असल्याने घटनेच्या ठिकाणी पोहचायला अग्निशमन दलाच्या जवानांना कसरत करावी लागली.
हेही वाचा - गेल्या २४ तासांमध्ये देशभरात ५३ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ३५४ रुग्णांचा बळी