ETV Bharat / state

अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे वाचला कामगारांचा जीव, मोरवाडीतील 'मोहम्मदिया आर्ट ग्लास' कंपनीतील घटना

पिंपरी-चिंचवड जवळील मोरवाडी येथील 'मोहम्मदिया आर्ट ग्लास कंपनीत' शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. महावितरणाच्या अकार्यक्षमतेमुळे कामगारांचा जीव धोक्यात.

author img

By

Published : Jul 7, 2019, 3:30 PM IST

मोरवाडीतील अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे चार कामगारांचा वाचला जीव

पुणे - शहरालगत असणाऱ्या पिंपरी-चिंचवडजवळील मोरवाडी येथील एका ग्लास कंपनीत मीटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. कंपनीचे शटर बाहेरून बंद असल्याने कामगारांना बाहेर पडता येत नव्हते. कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच अग्निशमन दलाला याची माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला. महावितरणाकडे वारंवार तक्रार देऊनही त्याची दखल घेतली नाही. यांमुळे कामगारांना स्वतःच्या जीवाशी सामना करावा लागला आहे.

fire-accident-in-morvadi-pcmc-pune
आर्ट ग्लास कंपनीत अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे चार कामगारांचा वाचला जीव वाचला

मोरवाडी येथे रात्री सव्वा अकरा वाजता 'मोहम्मदिया आर्ट ग्लास' येथे शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. आग लागली तेव्हा कंपनीमध्ये चार कामगार झोपले होते. मीटरमधून धूर निघत असल्याचे एकाने पाहिले. परंतु बाहेरून शटर बंद असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. शॉर्टसर्किटमुळे लोखंडी शटर मध्ये विजेचा प्रवाह उतरला होता, म्हणून कोणी शटरकडे गेले नाही. आत झोपलेल्या कामगारांपैकी इरफान शेख याने प्रसंगावधान राखत फोनद्वारे अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महावितरणला फोन करून वीजप्रवाह बंद करण्यास सांगितला आणि आतील कामगारांना आवाज देऊन शटर उघडण्यास सांगितले. कामगारांनी शटरमध्ये करंट उतरल्याचे सांगितले, मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धिर देत वीजप्रवाह खंडित केल्याचे सांगितले. अखेर मध्यरात्रीच्या सुमारास कामगारांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Intro:mh pun 02 fire accident av 10002Body:mh pun 02 fire accident av 10002

Anchor:- पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडीत शॉर्टसर्किट होऊन आग लागली होती. महावीतरणकडे वारंवार तक्रार देऊन ही त्याची दखन न घेतल्यामुळे चार कामगारांचा जीवावर बेतले असते. रात्री उशिरा कामगार झोपलेल्या आर्ट ग्लास कंपनीत शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. बाहेरून शटर बंद असल्याने कामगारांना बाहेर पडता येत नव्हते. वेळीच फोनद्वारे अग्निशमन दलाला याची माहिती दिल्याने मोठा अनर्थ टळला. इरफान शेख वय-४५, अखिल मुजावर वय-४५, आसिफ वय-३५, शान बाज वय-३५ अशी कंपनीत झोपलेल्या कामगारांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, मोरवाडी येथे रात्री सव्वा अकरा वाजता मोहम्मदिया आर्ट ग्लास येथे शॉर्टसर्किट होऊन मीटरमध्ये आग लागली होती. कंपनीमध्ये चार कामगार झोपले होते. मीटरमधून धूर निघत असल्याचे एकाने पाहिले. परंतु, बाहेरून शटर बंद आणि मोठा पाऊस सुरू असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. परिसरात करंट देखील उतरला होता. म्हणून कोणी शटरकडे गेले नाही. आत झोपलेल्या कामगार इरफान शेख याने फोनद्वारे अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशामक अधिकारी अशोक कानडे, हनुमंत होले, निखिल गोगवले, अमोल चिपळूणकर, संभाजी दराडे, वाहन चालक विशाल बाणेकर हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अगोदर महावितरण ला फोन करून वीजप्रवाह बंद करण्यास सांगितला आणि आतील घाबरलेल्या कामगारांना आवाज देऊन शटर उघडण्यास सांगितले. तेव्हा, शटरमध्ये करंट उतरल्याचे सांगितले. मात्र अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना धिर देत वीजप्रवाह खंडित केल्याचे सांगितले आणि कामगारांनी सुटकेचा स्वः सोडला, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.